आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचे चार पर्यावरणप्रेमींचर वाघ वाचविण्यासाठी 1200 किमीची यात्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वाघांची घटती संख्या, वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न, जंगलांना निर्माण झालेला धोका, याबाबत आवश्यक असलेली जनजागृती करण्यासाठी मुंबईतील चौघे जण सरसावरले आहेत. ताडोबा ते मुंबई अशी सायकल यात्रा काढून हे चौघे जण रस्त्यातील विविध शहरांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती करीत आहेत. ही यात्रा शुक्रवारी शहरात दाखल झाली.

‘टायगर सायकल वाक’ या नावाने मुंबईचे सुनील जोशी, दादा सावंत, राकेश कांजळेकर, संजय इंगवले हे चौघे जण सायकलवरून प्रवास करीत आहेत. ताडोबा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, मलकापूर, भुसावळमार्गे प्रवास करीत ही सायकलयात्रा शुक्रवारी शहरात दाखल झाली. मू.जे.महाविद्यालयाच्या लेडीज होस्टेलमध्ये त्यांनी या सायकलयात्रेचा उद्देश सांगितला. देशभरात वाघांची घटती संख्या चिंतेचे कारण आहे. वन्यजीव आणि वने या शाश्वत संपत्तीला जोपासण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

20 हजार विद्यार्थ्यांशी संपर्क
ताडोबा ते मुंबई या 1200 किमीच्या प्रवासात जळगावपर्यंतच्या टप्प्यात या टीमने विविध शहरातील तब्बल 20 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शनिवारी ए.टी. झांबरे, नंदिनीबाई विद्यालयातही ते मार्गदर्शन करणार आहेत. येथून ही यात्रा धुळे, मालेगाव, नाशिक, ठाणे आणि मुंबई असा प्रवास करणार आहेत.

ताडोबाची माहिती
ताडोबा अभयारण्यातील वाघांची संख्या, वनाचा प्रकार, पर्यावरण, वातावरण यासंदर्भात सुनील जोशी यांच्या टीमने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. वाघांबाबत जागृती करण्यावर त्यांचा भर आहे. वाघांची संख्या वाढवण्यासाठी त्यांची शिकार होण्याचे प्रकार थांबविणे आवश्यक असल्याबाबत ते विद्यार्थ्यांमध्ये जागृती करीत आहेत.