आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव जिल्ह्यात जीर्ण झालेली भिंत कोसळून चौघे ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जीर्ण झालेल्या घराची भिंत अंगावर कोसळून माता, पित्यासह दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा भडगावातील जागृती चौकात घडली. दयाल प्रेमदास चौधरी (30) यांचे भडगावातील मेन रोडवर दयाल कापड दुकान आहे.


रक्षाबंधनानिमित्त त्यांच्या पत्नी ज्योती चौधरी (26), मुलगा कृष्णा (5) व मुलगी श्रेया (3 वर्षे) हे सर्वजण शिरपूर येथे माहेरी गेल्या होत्या, तर दयाल चौधरीदेखील राखी बांधण्यासाठी बहिणीकडे नाशिकला गेले होते. येताना पत्नीला सोबत घेऊन शनिवारी सायंकाळी भडगावात पोहोचले. घरी आल्यावर जेवण केले. त्यानंतर झोपले ते परत उठलेच नाहीत. रात्री दोन वाजता घराची भिंत त्यांच्या अंगावर पडली आणि त्यात या चार जणांचा जागीच मृत्यू झाला.


घर माती, चुन्याचे
दयाल चौधरी हे तीन खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहत होते. ते घर माती व चुन्याचे होते, त्याला वरून सिमेंटचे प्लास्टर आहे. चौधरी यांच्या शेजारी दगडू उपाध्याय यांच्या मालकीचे पडीक घर होते. घर जीर्ण झाल्यामुळे ते रिकामे करण्यात आले होते. या घराच्या छतावर सहा फूट मातीची भिंत मनो-यासारखी उभी होती. सततच्या पावसाने भिंत खचली अन् ती कोसळून थेट दयाल चौधरी यांच्या छतावर कोसळली. छत लाकडी पाट्यांचे असल्याने छत फाडून भिंत
चौधरी कुटुंबीयांच्या अंगावर आली.


..तर नातवंडे बचावली असती
दयाल चौधरी यांचे आई-वडील दुस-या खोलीत झोपले असल्याने ते बचावले. रात्री साडेदहा वाजेपर्यंत ते नातवासोबत खेळले, गप्पा मारल्या. त्यानंतर नातू कृष्णा व नात श्रेया यांना आमच्याजवळ झोपा, असे त्यांनी सांगितले. मात्र त्यांनी ऐकले नाही. आईजवळ झोपण्याचा हट्ट धरला. त्यांनी आजी-आजोबांचे म्हणणे ऐकले असते तर त्यांचे प्राण वाचले असते.