आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. सतीश पाटलांवर फसवणुकीचा गुन्हा, जे.टी.महाजन सूतगिरणी प्रकरण अंगलट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जे.टी.महाजन सूतगिरणी खरेदीपोटी मिळालेल्या कोटी ७९ लाख २८ हजार ७५० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणात जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यासह आठ जणांवर फसवणूक अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. याप्रकरणी अॅड. विजय भास्कर पाटील यांनी फिर्याद दिली हाेती.

आमदार डॉ. सतीश पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना जे.टी.महाजन सूतगिरणी विक्री करण्याकरिता निविदा काढण्यात आली होती. त्यासाठी धरणगाव येथील लक्ष्मी टेक्सटाइल्सने ११ कोटी १७ लाख १५ हजार रुपयांत सूतगिरणी खरेदी करण्याची निविदा पाठवली होती. त्यासाठी वनफोर रक्कम जिल्हा बँकेत भरली होती. परंतु ही सूतगिरणी खरेदी झाली नाही. मात्र, आमदार डॉ. पाटील यांच्यासह आठ संशयितांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग करून लक्ष्मी टेक्सटाइल्सने जमा केलेली रक्कम जिल्हा बँकेत जमा करता त्यांना परस्पर परत केली. यामुळे आमदार डॉ. पाटील यांच्यासह एस.झेड.पाटील, सुरेश सीताराम चौधरी, नयनकुमार जीवनलाल सराफ, प्रकाश आनंदा नारखेडे, लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी टेलर, अनिल बन्सीलाल सोमाणी आणि भिकन काशिनाथ माळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्याम तरवाडकर तपास करीत आहेत.

मंडळाचा ठराव नव्हता
अनामत रक्कम म्हणून दिलेली दोन कोटी ७९ लाख २८ हजार ७५० ही रक्कम त्यांना परत देण्याचा ठराव संचालक मंडळाने केला नव्हता. एस.झेड. पाटील हे बँकेतर्फे सूतगिरणीवर प्राधिकृत अधिकारी होते. पाटील यांच्याच टिपणीनुसार अनामत रक्कम लक्ष्मी टेक्सटाइल्सला परत करावी, अशी शिफारस त्यांनी केली होती. ही रक्कम जिल्हा बँकेत अडकल्याने बँकेत जमा रकमेवर चुकीची बेकायदेशीर व्याजाची तसेच नुकसानभरपाई पाेटी १० कोटींची मागणी लक्ष्मी टेक्सटाइल्सने केली असल्याचेही टिपणीत म्हटले होते. दरम्यान, हे प्रकरण डीआरटी कोर्टात गेले, तेथे ते बँकेच्या बाजूने निकाल लागले. परंतु, पुनर्विलोकन अर्ज लक्ष्मी टेक्सटाइल्सने केल्यामुळे हे प्रकरण डीआरटी, उच्च सर्वाेच्च न्यायालयात जाऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे अशा परिस्थितीत निविदाधारकाची रक्कम जास्त वेळ ठेवता येणार नाही. तसेच निविदातील अटीशर्तींचा भंग होईल, असे कारण दाखवून विक्रीप्रक्रिया रद्द करून अनामत रक्कम परत करण्याची शिफारस करण्यात आली. त्यावर डॉ.पाटील यांनी हाेय, असा शेरा देत स्वाक्षरी केली. डॉ.पाटील यांना असा कायदेशीर अधिकार नसतानाही त्यांनी असे कल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ऑडिटरनेही ओढले ताशेरे....
जे.टी. महाजन सूतगिरणी विक्री विक्रीप्रक्रिया रद्दवर बँकेच्या लेखापरिक्षकांनी ताशेरे ओढल्याचा अहवाल आहे. लक्ष्मी टेक्सटाइल्सने १६ ऑगस्ट २०११ रोजी केलेल्या करारानुसार बँकेकडून कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई व्याज मागणार नाही. न्यायालयाच्या अंतिम निकालास अधीन राहून, असे लिहून दिलेले असताना त्यांना अनामत रक्कम घाईने परत केल्याचे दिसून येते. सदर रक्कम परतकर्त्याला लक्ष्मी टेक्सटाइल्सकडून येणारे गिरणीचे भाडे, त्यांच्या कालावधीतील वीजबिल, कामगार देणीबाबत कोणतीही शाहनिशा करता त्याबाबत तारण ठेवता पूर्ण रक्कम परत केलेली आहे. ही सर्व बाब संशयास्पद वाटत असल्याने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे, असे लेखापरिक्षकांनी अापल्याअहवालात म्हटले आहे.

मुदतीच्या चार दिवस आधीच दिले आदेश
डॉ.पाटीलयांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची मुदत ऑक्टोबर २०११ रोजी संपणार होती. तत्पूर्वी ऑक्टोबर २०११ रोजीच त्यांनी लक्ष्मी टेक्सटाइल्सला पैसे परत करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली.