आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम काेड विचारून लांबवले १२ हजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यपरिवहन महामंडळाच्या चालकाला बँकेच्या एटीएमचा कोड विचारून अज्ञात ठगाने त्यांच्या बँकेच्या खात्यातून १२ हजार परस्पर काढून घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली अाहे. त्यांच्या खात्यावर नुकताच पगार जमा झाला हाेता.
जळगाव अागाराचे बसचालक महेश गायकवाड शनिवारी सायंकाळी बसस्थानकात असताना त्यांना राकेश शर्मा नावाच्या व्यक्तीचा माेबाइलवर काॅल अाला. सुरुवातीला ७५४४९३३७२९ या मोबाइल क्रमांकावरून फोन आला. त्या वेळी त्याने मी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून बोलतोय, असे सांगून एटीएम कार्डवरील १४ अंकांपैकी शेवटचे सहा अंक िवचारले. त्यानंतर काही वेळानंतर ९७०९९८१०२३ या क्रमांकावरून काॅल अाला. त्या वेळी त्या भामट्याने तुम्ही एटीएमचा क्रमांक दिला नाही. त्यामुळे अाता तत्काळ तुमचे एटीएम ब्लाॅक हाेईल, अशी धमकी दिली. तसेच तुम्हाला बँकेकडून यापूर्वी एसएमएसही पाठवला आहे, त्यालाही तुम्ही उत्तर दिले नाही, असे सुनावले. त्यामुळे घाबरलेल्या गायकवाड यांनी एटीएमवरील क्रमांक भामट्याला सांगून टाकला. एटीएमचा क्रमांक सांगितल्यानंतर लगेचच १२ हजार रुपये गायकवाड यांच्या खात्यातून काढून घेण्यात अाले. पैसे निघाल्यानंतर पहिल्या वेळी गायकवाड यांनी फोन करून विचारणा केल्यावर भामट्याने माफीही मागितली. या प्रकरणी त्यांनी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.