आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट साेने देऊन घेतली अस्सल २४ कॅरेटची अंगठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सराफ बाजारातील खाेंडे बंधू ज्वेलर्सच्या दुकानात बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजता एका महिलेने बनावट साेने देऊन त्या बदल्यात २४ कॅरेटची अस्सल अंगठी १२०० रुपये घेऊन धूम ठाेकली हाेती. हा प्रकार वेळीच दुकान व्यवस्थापकाच्या लक्षात अाल्यानंतर पाेलिसांनी ठक महिलेला सुभाष चाैकातून ताब्यात घेतले अाहे.
सराफ बाजारात किरण खाेंडे यांच्या मालकीच्या खाेंडे बंधू ज्वेलर्स हे दुकान अाहे. दुकानात बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजता नंदा पाटील (रा. कल्याण, वय ६०) ही महिला दागिने माेडून नवीन दागिने खरेदीसाठी अाली हाेती. तिने व्यवस्थापक नीलेश महाले यांच्याकडे ४.६६० ग्रॅम वजनाचे बनावट दागिने माेड म्हणून दिले. ते महाले यांनी तपासल्यानंतर महिलेने ग्रॅमची २४ कॅरेटची साेन्याची अंगठी १२०० रुपये राेख घेतले. त्यानंतर या महिलेने घाईत दुकान साेडून धूम ठाेकली. तर दुसरीकडे सराफाच्या दुकानातील कारागिराने दागिने अॅसिडमध्ये टाकल्यानंतर त्याला ते बनावट असल्याचे लक्षात अाले.

चाैकशीत पाेलिसांची दिशाभूल
पाेलिसांनी चाैकशीदरम्यान महिलेला नाव विचारले असता, तिने सुरुवातीला गंगा मिश्रा थाेड्या वेळानंतर नंदा प्रकाश पाटील (रा. रेल्वे काॅर्टर) असे नाव सांगितले. तसेच प्रकृती खराब झाल्याचे नाटक करून पाेलिस ठाण्यात झाेपली. या वेळी पाेलिसांनी तिची झडती घेतली असता, तिच्याकडे बनावट साेन्याचे चार कानातल्या रिंगा सापडल्या पण अंगठी सापडली नाही. अंगठीबाबत तिला विचारणा केली असता तिने झटापटीत अंगठी पडल्याचे सांगितले.
महिलेजवळ सापडलेल्या कानातील बनावट रिंग.