आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाेलण्यासाठी माेबाइल मागून तरुणाने ठाेकली धूम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘भाई,मेरी मॉ की तबियत ठीक नहीं है, फाेन करने के लिए अापका माेबाइल दाे मिनट दीजिए’ असे सांगून बाेलण्याच्या बहाण्याने एका तरुणाने माेबाइल घेऊन काही कळण्याच्या अात पाेबारा केला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रेल्वेस्थानकावर घडली.
राजस्थानमधील व्यापारी अवी नरपतराज मेहता हे जळगावात अाले हाेते. ते रेल्वेस्थानक परिसरातील एक लाॅजमध्ये वास्तव्याला हाेते. शुक्रवारी रात्री १० वाजता जेवण झाल्यानंतर ते पान खाण्यासाठी पानटपरीवर अाले. या वेळी हाॅटेल रसिकासमाेर एक तरुण उभा हाेता. त्याने मेहता यांच्याजवळ येऊन अाईची तब्येत खूप खराब अाहे. त्यामुळे काॅल करण्यासाठी माेबाइल देण्याची विनंती केली. मेहता यांनी मदत करण्याच्या उद्देशाने त्या तरुणाला फाेन करण्यासाठी माेबाइल दिला. मात्र, माेबाइल हातात पडताच त्याने जिल्हा परिषदेच्या दिशेने धूम ठाेकली. मेहता यांनी त्याचा पाठलाग केला; परंतु अंधाराचा फायदा घेऊन ताे तरुण पसार झाला. याप्रकरणी मेहता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पाेलिस ठाण्यात नाेंद केली.

जळगावात गुन्हेगारीचा चढता अालेख
जिल्ह्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचे बारा वाजले अाहेत. २५ दिवसांत खून, हाणामाऱ्या, घरफाेड्या, चाेऱ्या, जबरी चाेऱ्या, माेटारसायकल चाेरण्याचे प्रमाण प्रचंड वाढले अाहे. मात्र, त्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण नगण्य अाहे. स्थानिक गुन्हे शाखेचे काम ढेपाळलेले अाहे. कारण गेल्या चार महिन्यांत एकही माेठा गुन्हा उघडकीस अाणण्यात त्यांना यश अालेले नाही.

पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात
याप्रकरणी रेल्वेस्थानक परिसरातील कुरियरच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज शहर पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे. त्यात एक तरुण पळतानाचे फुटेज पाेलिसांना मिळाले अाहे.