आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएमच्या पाकिटामध्ये लिहिलेला पासवर्ड वापरून लांबवले दाेन लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात चाेरट्यांनी सणासुदीत पुन्हा धुमाकूळ सुरू केला अाहे. चाेरट्यांनी अाॅक्टाेबर ते २४ अाॅक्टाेबर दरम्यान अासावानगरातील सिद्धिविनायक काॅलनीत निवृत्त विक्रीकर निरीक्षकाच्या घरात घरफाेडी केली. यात ६० हजाराचा एेवज अाणि चार एटीएम कार्ड चाेरून नेले. त्यातील चारही एटीएम कार्डच्या पाकिटामध्ये पासवर्ड लिहिलेले हाेते. त्या पासवर्डचा वापर करून चाेरट्यांनी ११ ते १६ अाॅक्टाेबरदरम्यान जाेधपूर येथील एटीएममधून ११ वेळा चारही खात्यातून लाख १२ हजार ८०० रुपये काढले. त्यामुळे या चाेरीत त्यांनी एकूण लाख ७२ हजार ८०० रूपयांवर चाेरट्यांनी डल्ला मारला. दरम्यान, साेमवारी पैसे काढल्याचा एसएमएस निवृत्त विक्रीकर निरीक्षकाच्या पत्नीने पाहिल्यानंतर हा प्रकार लक्षात अाला.
सिद्धिविनायक काॅलनीतील प्लाॅट क्रमांक ३३मध्ये निवृत्त विक्रीकर निरीक्षक रमेश रामदास तायडे (वय ६८) राहतात. अाॅक्टाेबरला रात्री ते त्यांच्या पत्नी निवृत्त शिक्षिका प्रतिभा तायडे यांच्यासाेबत पुणे येथे मुलाकडे गेले हाेते. मुलाला भाड्याचे घर बदलायचे असल्याने ते काही दिवस त्या ठिकाणी थांबले हाेते. साेमवारी पहाटे वाजता परत अाल्यानंतर त्यांना लाेखंडी दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच लाकडी दरवाजाचा काेयंडाही तुटलेला दिसला. चाेरट्यांनी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले हाेते. घरातील दाेन्ही कपाट ताेडून चाेरट्यांनी कपाटात ठेवलेले १० हजार रुपये राेख, दाेन ताेळे साेन्याचे दागिने असा एकूण ६० हजाराचा एेवज लंपास केले. तसेच दाेन स्टेट बँकेचे अाणि दाेन महाराष्ट्र बँकेचे एटीएमही चाेरले अाहे. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

११ ते १६ अाॅक्टाेबर दरम्यान काढले पैसे
तायडे यांच्याकडे दाेन एसबीअायचे अाणि दाेन बँक अाॅफ महाराष्ट्र असे चार एटीएम कार्ड अाहेत. त्यांचे पासवर्ड लक्षात राहत नाही, त्यामुळे त्यांनी प्रत्येक कार्डच्या पाकिटावर पासवर्ड लिहून ठेवलेले हाेते. चाेरट्यांना हे पासवर्ड दिसल्यानंतर त्यांनी जाेधपूर येथील सुविधा काॅम्प्लेक्समधील बँक अाॅफ इंडियाच्या एटीएममधून सरदारपुराच्या स्टेट बँकेच्या एटीएममधून ११ अाॅक्टाेबर ते १६ अाॅक्टाेबरदरम्यान ११ वेळा लाख १२ हजार ८०० रुपये काढलेे अाहे.

एसएमएसमुळे झाला उलगडा : तायडेयांच्या पत्नी प्रतिभा तायडे यांचा माेबाइल क्रमांक बँकेच्या खात्याशी जाेडलेला अाहे. कंपनीतर्फे सतत येणाऱ्या एसएमएसमुळे त्या अालेले एसएमएस बघत नाही. पण साेमवारी त्यांनी बँकेचा एसएमएस बघितल्यानंतर त्यांना माेठा धक्का बसला. कारण चाेरट्यांनी चाेरलेल्या एटीएममधून जाेधपूर येथून लाख १२ हजार ८०० रुपये काढून घेतलेले हाेते. त्यांनी तत्काळ बँकेशी संपर्क साधून कार्ड ब्लाॅक केले. मात्र, ताेपर्यंत उशीर झाला हाेता. याप्रकरणी तायडे यांनी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...