आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया वीज कर्मचार्‍याला दिले पकडून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘मी क्रॉम्प्टनचा कर्मचारी असून मला आपल्या घराच्या मीटरची तपासणी करायची आहे.’ असे सांगून पिंप्राळा परिसरातील वदि्यानगरामध्ये राहणार्‍या वंदना काबरा यांच्या घरात एका तोतया कर्मचार्‍याने प्रवेश करून मीटरची तपासणी केली. मीटरमध्ये फॉल्ट असल्याचे सांगून कारवाईची धमकी दिली. ही कारवाई टाळण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, प्रसंगावधान राखून काबरा यांनी आपण वीज चोरी केलीच नाही तर पैसे का घ्यावे म्हणून त्यांनी थेट महिला दक्षता समितीच्या सदस्या स्मिता वेद यांना घरी बोलावले. त्यांनी तोतया कर्मचार्‍याला कोंडून ठेवले. त्यानंतर रामानंद पोलिसाना बोलवून त्याला ताब्यात दिले.
काबरा यांच्या घरी पाच महिन्यांपूर्वी प्रमोद श्रीधर भोळे व लाला नावाची व्यक्ती क्रॉम्प्टनचे कर्मचारी असल्याचे सांगून मीटरची तपासणी केली. त्यानंतर बुधवारी भोळे पुन्हा काबरा यांच्या घरी मीटर तपासणीसाठी अाला. त्याने तुम्ही मीटरमध्ये घोळ केल्याचे सांगितले. तडजाेडीसाठी २० हजारांची मागणी केली. त्या वेळी काबरा यांनी त्यांच्या बहिणीचे पती सुरेश तोतला यांना भेटण्यासाठी सांगितले. बुधवारी भोळे त्यांना बहिणाबाई उद्यानाजवळ भेटला. त्या वेळी त्यांनी ११ हजार तरी द्यावे लागतील असे सांगितले. गुरुवारी भोळे याने काबरांना फाेन करून भरारी पथक पाठवण्याची धमकी दिली.
काेण आहे प्रमोद श्रीधर भोळे?
एमअायडीसी परिसरात राहणारा प्रमोद भोळे हा खासगी इलेक्ट्रिशियन आहे. घरात िफटिंगची कामे करणारा हा ठग कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने असे प्रकार करीत असल्याचा संशय पोलिसांनी या वेळी व्यक्त केला. त्याच्यासाेबत असणारा लालाबाबत मात्र त्याने पोलिसांना सांगण्यास नकार दिला. मात्र, ताेच याप्रकाराचा मास्टर माइंड असल्याचे काबरा यांनी सांगितले. भोळेने या वेळी स्मिता वेद यांना भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्याशी फाेनवरून बोलणे करून दिल्याचे सांगितले.
काबरा यांनी दाखवले प्रसंगावधान
भोळे याने फाेन केल्यानंतर काबरा यांनी महिला दक्षता समितीच्या सदस्या स्मिता वेद यांना बोलावले. त्यानंतर भोळे याला पैसे घेण्यासाठी घरी या म्हणून सांगितले. ताे माेटारसायकलने (एमएच- १०, बीएच- ८४५३) अाला. त्या वेळी त्याने पुन्हा कारवाईची धमकी दिली. वेद यांनी त्याला घरात बोलावून अर्धा तास काेंडून ठेवत रामानंदनगरच्या पोलिसांना बोलावले. १० मिनिटांमध्ये शैलेश चव्हाण, अशाेक पाटील अािण ज्ञानेश्वर काळे हे पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांच्याशीही भोळे याने हुज्जत घातली. मात्र, त्यांनी त्याला ताब्यात घेतले.
काय आहे माेडस अाॅपरेंडी ?
शहरातील एकट्या महिला राहत असल्याचे घर शाेधणे. त्या घरात घुसून क्रॉम्प्टनचे तपासणी अिधकारी असल्याचे सांगणे. त्यानंतर मीटरला एक इलेक्ट्रिक यंत्र लावून तपासणी करतात. त्यानंतर मीटरचे पल्स कमी असल्याचे सांगतात. भरारी पथक बोलावून कारवाईची धमकी द्यायची. त्यानंतर तडजाेडीची भाषा करून पैसे उकळण्याचे माेडस अाॅपरेंडी भोळे वापरत हाेता.
एकटी महिला हेरून पैसे उकळण्याचे असेही धंदे
घरात एकटी महिला राहत असल्याचे हेरून मीटरमध्ये घोळ केल्याची बतावणी करून पैसे उकळण्याचा धंदा भोळे याचा आहे. वंदना यांचे पती सतीश काबरा हे नािशक जिल्ह्यातील निफाड येथे अायटीअाय महावदि्यालयात नाेकरी असल्याने त्या एकट्याच राहतात. हे गेल्या चार महिन्यांपूर्वीच भोळे याने हेरले हाेते. त्याने अाणखीन असे प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नावही चुकीचे सांगितले हाेते
क्रॉम्प्टनचे अिधकारी असल्याचे सांगून पैशांची मागणी केली. बुधवारी स्वत:चे नाव पाटील सांगितले. अाज भोळे सांगितले. कालपासून अनेक वेळा फाेन करून पैशांसाठी धमकी देऊन त्रास दिला.
- वंदना काबरा, तक्रारकर्ती महिला
नियंत्रणासाठी पावले उचलणार
पैसे घेणारा अामचा कर्मचारी असेल तर त्याला तत्काळ निलंबित करण्यात येईल. ताे बाहेरचा काेणी असेल तर तक्रार देऊन पोलिस कारवाई करण्यात येईल.
भवानीप्रसाद राव, युिनट हेड, क्रॉम्प्टन