आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव पालिकेतील भरतीप्रक्रिया गोत्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पालिकेतर्फे मागासवर्गीयांची रिक्त पदे भरण्यासाठी विशेष भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. प्रक्रिया राबवताना तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेत पात्र ठरलेल्यांची निवड यादी जाहीर करताना त्यात तांत्रिक चुका झाल्या आहेत. या चुकांचा मुद्दा उपस्थित करीत हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. या सर्व गोंधळात वाहनचालक म्हणून पात्र ठरलेल्या इतर वाहनचालक उमेदवारांच्या नियुक्त्या आठ महिन्यांपासून रखडल्या आहेत.

चालक पदाच्या 18 जागांपैकी भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या 3 व उर्वरित इतर प्रवर्गासाठीच्या जागा होत्या. तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेत पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करताना झालेल्या तांत्रिक चुकांमुळे प्रशांत कंखरे व इतरांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. मात्र, भटक्या विमुक्त जाती-जमातींसाठी न्यायालयात प्रकरण असताना इतर 15 जागांवर निवड झालेल्या पात्र उमेदवारांचीही अडवणूक करण्यात येत आहे. तीन जागा वगळता इतरांना सेवेत सामावून घेण्याची तसदी प्रशासनाने घेतलेली नाही. पात्र ठरू नही आठ महिन्यांपासून घरी बसण्याची वेळ आलेल्या सुहास अभंग व इतर उमेदवारांनी निवड आदेश काढण्याची मागणी केली आहे.


103 पदांची जाहिरात
आस्थापनेवरील मंजूर रिक्त पदे भरण्यासाठी ऑगस्ट 2011 मध्ये निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. कनिष्ठ अभियंता, कामगार कल्याण अधिकारी, लॅब टेक्निशियन, आरोग्य निरीक्षक, परिचारिका, क्लोरीन ऑपरेटर, वायरमन, प्लंबर, फिटर, लिपिक, पंप ऑपरेटर, चालक अशा 103 पदासाठी जाहिरात होती.