आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी घेतात कर्मचार्‍यांकडून दरमहा लाच’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागातले 70 टक्के कामय कर्मचारी कामावर न येता नुसत्याच हजेरी पुस्तकात सहय़ा करतात आणि त्या बदल्यात आरोग्य निरीक्षक आणि अधीक्षकांना 3 हजार रुपये महिना देतात, असा गंभीर आरोप खुद्द उपमहापौर सुनील महाजन यांनीच मंगळवारी जाहीरपणे केला.

अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकार्‍यांवरही उपमहापौरांनी असेच गंभीर आरोप केले असून संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. उपमहापौरपदी नियुक्ती झाल्यानंतर 15 दिवसांतच असे गंभीर आरोप केल्यामुळे सुनील महाजन चर्चेत आले आहेत.

उपमहापौरांचे आरोप
0 आरोग्य विभागातील अधिकारी भ्रष्ट आहेत.
0 कायम कर्मचार्‍यांची खोटी हजेरी भरण्यासाठी प्रत्येक कर्मचार्‍याकडून 3 हजार रुपये महिना घेतला जातो.
0 आरोग्याधिकारी, अधीक्षक, निरीक्षक ही रक्कम वाटून घेतात.
0 जंतूनाशक पावडरसाठी 60 हजार रुपये घेतले. प्रत्यक्षात पावडर आणलीच नाही.
0 अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकारीही लाचखोर आहेत.
0 या विभागातले कर्मचारी अतिक्रमणधारकांकडून हप्ते घेतात.
0 वसूल झालेल्या हप्त्यातून मोठी रक्कम अतिक्रमण निर्मूलन अधीक्षकांना दिली जाते.

तपासणीत लगेच आला प्रत्यय
प्रभाग अधिकारी उदय पाटील यांनी प्रभाग एकमधील आरोग्य विभागाच्या युनिट क्रमांक 1 व 2 मध्ये मंगळवारी अचानक तपासणी केली. यात 64 झाडू कामगार आढळून आले नाही, त्यामुळे कांतीलाल वाघ या मक्तेदारास 32 हजारांचा दंड करण्यात आला. तसेच 38 गटार कामगार आढळून न आल्याने लहू पर्वते या मक्तेदारास 9500 रुपये दंड करण्यात आला. या तपासणीत पालिकेच्या आरोग्य विभागातील कायम असलेले 20 कर्मचारी कामावर आढळून आले नाहीत.