जळगाव- मूळच्याउत्तर प्रदेशातील ओम फायनान्स आणि साई समर्थ फायनान्शियल कन्सल्टिंग या संस्थांची जळगावात कार्यालये सुरू करून शेतक-यांची लाखो रुपयांची फसवणूक करणा-या तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तिघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
भवानीशंकर गोकुळदास पटेल (वय ४१, रा. टिमरणी ता.जि. हरदा, उत्तर प्रदेश), प्रेमसिंह शेरपालसिंह ठाकूर (वय ४१, रा.सासणी गेट, अलिगड, उत्तर प्रदेश) आणि रहिशपालसिंह यादरामसिंह कुशवाह (वय ३२, सासणी गेट, उत्तर प्रदेश) असे कोठडीत गेलेल्या संशयितांची नावे आहेत. तर बी.पी. सिंग आणि मोहीत भारद्वाज हे फरार आहेत.
या सर्वांनी मिळून १२ सप्टेंबर २०१० रोजी शहरातील गोलाणी मार्केट येथे ओम फायनान्स नावाने दुकान सुरू करून शेतकऱ्यांना टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली. अनेक शेतकऱ्यांकडून त्यांनी डीडी चेकद्वारे सभासद फी, कर्ज प्रकरणाची कागदपत्रे, वकिलांची फी अशा नावाने पैसे घेतले. त्यानंतर कर्ज प्रकरणात त्रुटी आढळून आल्याचे सांगत कुणालाच कर्ज उपलब्ध करून देता पोबारा केला. याप्रकरणी सटाणा तालुक्यातील सोनपूर येथील जाकीर सत्तार खाटीक यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादित संशयितांनी लाख ९३ हजार ७३५ रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले असून त्या पैकी २१ हजार रुपये संशयितांनी परत केले आहेत. या गुन्ह्याचा तपास होऊन अखेर तिघांना अटक केली आहे.