आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधीचे पैसे भामट्याने लांबवले, गोलाणी मार्केट परिसरातील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सुनसगाव येथून शहरात औषधी खरेदी करण्यासाठी आलेल्या एका प्रौढाला मदत करण्याच्या बहाण्याने भामट्याने ‘मी औषधी आणून देतो, असे सांगत त्यांची ८०० रुपयांत फसवणूक केली. बराच वेळ शोध घेऊनही भामटा सापडत नसल्याने शेवटी प्रौढाला हताश होऊन पैसे नसल्याने औषधी घेता गावी परतावे लागले. ही घटना सोमवारी दुपारी ११.३० वाजता गोलाणी मार्केट परिसरात घडली.

सुनसगाव (ता.जामनेर) येथील शिवप्रसाद दगडू महाजन (वय ५६) हे सोमवारी सकाळी वाजता पत्नी शोभाबाई यांच्या मधुमेहाच्या औषधी पॅथॉलॉजीचा अहवाल घेण्यासाठी एकटेच जळगावात आले होते. भास्कर मार्केटसमोरील प्रशांत लॅब येथे ते उभे असताना त्यांना मोटारसायकलीवरून आलेल्या एका अनोळखी युवकाने गाठले. ‘तुम्ही येथे काय करताय? हॉस्पिटलचे काही काम आहे का?’, असे प्रश्न विचारून त्या युवकाने महाजन यांच्याशी संवाद वाढवला. यात त्या युवकाला महाजन हे औषधी घेण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याने मदत करण्याच्या बहाण्याने महाजन यांना मोटारसायकलीवर गोलाणीमार्केट परिसरात ग्रामीण भागातील लोकांची रेलचेल असते. त्यामुळे भामट्यांनी आपला मोर्चा गोलाणीकडे वळवला आहे. गेल्या महिन्यात अशाच प्रकारच्या ग्रामीण भागातील लोकांना रक्तपिशवी मिळवून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने २४०० रुपयांची फसवणूक केली होती. या दोन्ही पद्धती एकाच प्रकारच्या असल्याचे सोमवारी घडलेल्या घटनांमधून समोर आले आहे.

युवकाने मदतीचा आणला आव
महाजनयांना त्या भामट्यावर सुरुवातीला संशय आला होता. ते त्याला पैसे देणार नव्हते. मात्र, त्या भामट्याने आपण एका लोकप्रतिनिधीच्या मार्गदर्शनाने गरिबांची वैद्यकीय कामे करतो, असे सांगितले. तसेच महाजन यांच्या गावातील दोन-चार लोकांची नावे सांगून ते आपले मित्र असल्याच्या बनावट गोष्टी सांगितल्या. दरम्यान, सातत्याने मोबाइलवरून बनावट फोन करून कुणाला तरी औषधांची चिठ्ठी वाचून दाखवली. ‘ही औषधी पॅक करून ठेवा, मी आलोच घ्यायला’, असे सांगून महाजनांचा विश्वास त्याने संपादन केला. मदतीचा अती आव आणून त्याने ८०० रुपये मिळवून घेतले.

औषधी घेता माघारी फिरावे लागले प्रौढास
महाजनयांनी एक हजार रुपये आणले होते. त्यातील ७०० ते ८०० रुपयांची औषधी ते खरेदी करणार होते. मात्र, भामट्याने ८०० रुपये लांबवल्यामुळे त्यांच्याकडे २०० रुपयेच शिल्लक राहिले. तेवढ्याच पैशांत औषधी खरेदी करता येणार नसल्याने ते दुपारी १.३० वाजता हताश होऊन घरी परतले.

भामट्याचे वर्णन
भामटा२५ ते ३० वर्षे वयोगटातील होता. त्याच्याकडे लाल रंगाची मोटारसायकल होती. त्याने सफेद रंगाची पॅण्ट शर्ट घातले होते. त्याचा चेहरा गोल गोरा असून दाढी वाढलेली होती. मराठी अहिराणी भाषेत तो संवाद साधत होता.