आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी; शुभंकर फाउंडेशनचा उपक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वाढत्या महागाईमुळे विद्यार्थ्यांना खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शुभंकर फाउंडेशनतर्फे ‘चला शिकू या’ या अभियानांतर्गत सध्या नववी आणि अकरावीत असलेल्या 3 हजार विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची तयारी करण्यासाठी मार्च महिन्यात एका महिन्याचा मोफत (क्लास)शिकवणी घेतली जाणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश वर्मा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
यंदा दहावी आणि बारावीत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांसाठी हे क्लासेस घेण्यात येणार आहे. यात प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिले जाणार आहेत. दहवीसाठी 1500 आणि बारावीसाठी 1500 विद्यार्थी असणार आहेत. इंग्रजी, गणित, अकाउंट, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांची शिकवणी घेण्यात येणार आहे. प्रत्येक रविवारी चाचणी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्यात येणार आहे. या क्लासेससाठी नाव नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बीएसएनएल आॅफिसमागील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन जळगाव येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत संपर्क करावा लागणार आहे.

तज्ज्ञ प्राध्यापकांचा सहभाग
या उपक्रमात शुभंकर फाउंडेशनतर्फे शहरातील खासगी क्लासेसच्या प्राध्यापकांकडून शिकविले जाणार आहे. यासाठी प्रा.कोरान्ने, प्रा.सुरेश पांडे, प्रा.अभय कुळकर्णी यांनी तयारी दर्शविली आहे. या शिवाय आणखी काही प्राध्यापकांचा यात समावेश होणार आहे.

टॉपरांना मोफत क्लास
फाउंडेशनच्या वतीने एक महिना चालविल्या जाणाºया या क्लासेसमध्ये चाचणी परीक्षा होणार आहे. या परीक्षेमध्ये टॉप करणाºया पहिल्या दहा विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या वतीने वर्षभर मोफत क्लासेसची सुविधा पुरविली जाणार आहे.

पैशांअभावी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर क्लासेसमध्ये प्रवेश घेता येत नाही. परिणामी त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती असते. फाउंडेशनच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना मोफत क्लासेसची सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या खर्च वाचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- नीलेश वर्मा, अध्यक्ष, शुभंकर फाउंडेशन