आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: फ्रीजमधील शीतपेय, चाॅकलेटवर ताव मारून चाेरट्यांनी लांबवले ताेळे साेने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शीतपेय पिल्यानंतर चोरट्यांनी भिंतीवर ठेवलेली बाटली. - Divya Marathi
शीतपेय पिल्यानंतर चोरट्यांनी भिंतीवर ठेवलेली बाटली.
जळगाव: माेहन नगरात चाेरट्यांनी बंद घराचे कुलूप ताेडून फ्रीजमधील शीतपेय, चाॅकलेटवर ताव मारल्यानंतर घरफाेडी केल्याची घटना रविवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीस अाली. चाेरट्यांनी लाकडी कपाटाचे दरवाजे ताेडून ३६ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने ६ हजार किमतीचे चांदीचे दागिने असा सुमारे लाखाचा एेवज लंपास केला अाहे. याप्रकरणी साेमवारी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. शहरात गेल्या २९ दिवसांत १६ घरफाेड्या झाल्या अाहेत. 
 
माेहननगरातील प्लाॅट क्रमांक ११० धर्मेंद्र भय्या यांच्या मालकीचा अाहे. त्यात खालच्या मजल्यावर नितीन नंदलाल मंधाण (वय ३६) हे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा इच्छादेवी चाैकात एन. एन. सन्स नावाने ट्रेडिंगचा व्यवसाय अाहे. २६ मे राेजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ते पत्नी साेनिया अाणि मुलगा युगल यांच्यासह अमरावती येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी गेले हाेते. त्यांनी घरकाम करणारी राजश्री नावाच्या मुलीकडे घराची चावी दिली हाेती. २७ मे राेजी ६.३० वाजेच्या सुमारास घरात साफसफाई काम करून राजश्री कुलूप लावून निघून गेली. रविवारी सकाळी ८.३० वाजता ती पुन्हा साफसफाई करण्यासाठी अाली. त्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाला लावलेली दाेन्ही कुलपे जागेवर नव्हती. घराचा दरवाजा उघडाच हाेता. त्यामुळे तिने घरात जाऊन बघितले तर बेडरुममधील लाकडी कपाटाचे दरवाजे ताेडलेले दिसले. त्यामुळे तिने शेजारी राहणाऱ्या सुहास साहेबराव पाटील यांनी बाेलवले. त्यानंतर त्यांनी नितीन मंधाण यांना माेबाइलवरून चाेरी झाल्याची माहिती दिली. रविवारी सायंकाळी ७ वाजता मंधाण परत अाले. चाेरट्यांनी लाकडी कपाटाच्या लाॅकरमधून दुसऱ्या कपाटाची चावी घेऊन ते उघडले. त्यात ठेवलेले ९४ हजार रुपये किमतीचे ३६ ग्रॅम वजनाने साेन्याचे दागिने हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. 
 
घरफाेड्यांचा धुमाकूळ सुरूच
2 मे राेजी सेंट्रल बँक काॅलनीत ५० हजारांची घरफाेडी झाली. १० मे राेजी माेहाडी रस्त्यावरील लीलावती जैन अपार्टमेंटमध्ये दीड लाखांचा एेवज लंपास केला. १५ मे राेजी इच्छादेवी चाैकात २० हजारांची घरफाेडी त्याच दिवशी गुड्डुराजानगरात तीन ठिकाणी घरफाेडी २५ हजारांचा एेवज चाेरट्यांनी लांबवला. १६ मे राेजी रिंगराेड परिसरात, १९ मे राेजी अादर्शनगरात, २२ मे राेजी पार्वतीनगर, २३ मे राेजी शिवाजीनगर हुडकाेतील दाेन दुकाने एका घरात घरफाेडी झाली. २६ मे राेजी भुरे मामलेदार प्लाॅटमध्ये अाणि शाहूनगरात, २७ मे राेजी इंद्रप्रस्थनगरात चाेरी करून चाेरट्यांनी ११ ताेळे साेन्याचे दागिने लंपास केले. तर २७ मे राेजी माेहननगरात चाेरट्यांनी घर फाेडले अाहे.
 
 फ्रीजची केली तपासणी 
चाेरी करण्यापूर्वी चाेरट्यांनी फ्रीजची तपासणी केली. यात त्यांना शीतपेयाची (काेल्ड्रिंक्स) बाटली दिसली. ती काढून ते प्यायले. काेल्ड्रिंक्स पिल्यानंतर बाटली एका भिंतीवर ठेवली. त्यानंतर फ्रीजमधील चाॅकलेटवर चाेरट्यांनी ताव मारला. 

 
बातम्या आणखी आहेत...