आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवीगाळ केल्‍यावरुन मित्रांचा एकमेकांवर चाकू हल्ला; आईलाही मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला दीपक निकम. - Divya Marathi
सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला दीपक निकम.
जळगाव - शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणावरून गेंदालाल मिलमध्ये दोन मित्रांमध्ये वाद झाला. यात दोघांनी एकमेकांवर चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी गेंदालाल मिलमध्ये घडली. दोन्ही जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

कन्हैया रमेश चव्हाण (वय २२) दीपक मधुकर निकम (वय २२) अशी दोन जखमी मित्रांची नावे आहेत. दोघेजण गेंदालाल मिल येथेच राहतात. कन्हैया चव्हाण याची आई मायाबाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक निकम त्याचा भाऊ संदीप निकम हे दोन्ही शुक्रवारी दोन वाजेच्या सुमारास घराकडे आले. त्यांनी अंगणात असलेल्या कन्हैयाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कन्हैयाने जाब विचारल्यानंतर तिघांमध्ये बाचाबाची सुरू झाली होती.

 

काही वेळातच दीपक संदिप यांनी लाकडी दांड्याने कन्हैयास मारहाण करण्यास सुरुवात केली. तर दीपकने कन्हैयाच्या पोटात चाकूने भोसकून दुखापत केली. हाच चाकू कन्हैयाच्या हाती लागल्यानंतर त्याने देखील वार केले. भांडण सोडवण्यास गेले असता मायाबाई यांनाही मारहाण करण्यात अाली. कन्हैया यास कुटुंबीयांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मायाबाई यांनाही डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

 

एक ताब्यात
कन्हैया हा गंभीर जखमी असल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अाहे. शहर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या एकास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


 

बातम्या आणखी आहेत...