आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभरात शहरात झालेल्या चोऱ्यांच्या मोडसऑपरेंडीतून पोलिसांना संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आठवडाभरात शहरात झालेल्या चोऱ्यांच्या मोडसऑपरेंडीतून पोलिसांना संशय या घटनांमध्ये चोरट्यांनी वापरलेली पद्धत शहरातील चोरट्यांची नसून ती पर जिल्ह्यातील प्रांतातील चोरटे वापरतात तशी आहे, असा संशय पोलिसांना आहे. तर दुसरीकडे तीन घटनांमुळे शहरात चोरट्यांची मोठी टोळी कार्यरत झाली असून पोलिस प्रशासनाला त्यांच्यापर्यंत अद्याप कसे पोहोचता आले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हीआहे मोडसऑपरेंडी
रस्त्यात लावलेल्या गाडीची एकजण अगोदर टेहळणी करतो. गाडीत एकटाच व्यक्ती बसलेला असेल. तर दुसरा चोरटा गाडीच्या जवळपास येऊन काहीतरी सांगून चालकाचे लक्ष विचलित करतो. त्यानंतर त्याचा तिसरा जोडीदार गाडीच्या दुसऱ्या बाजूने दरवाजा उघडून गाडीतील बॅग लंपास करतो. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तसेच गाडीत पैशांची बॅग सोडून जाऊ नका. शहरात यापूर्वीही अशा पद्धतीने परप्रांतीय टोळ्यांनी चोऱ्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, सध्या शहरात चोरी करणारे चोरटे मराठी भाषेतून संभाषण करीत असल्याने ते पर जिल्ह्यातील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

केस : २९जुलैला नाशिक येथून उपचार घेऊन परतणाऱ्या बोदवड तालुक्यातील नीळकंठ पाटील (वय ५५) हे दुपारी वाजता टॉवर चौकातील आर्य निवास या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. त्यांनी त्यांची कार (क्रमांक एमएच- १५, डीसी- ३८२२) हॉटेलच्या बाजूला लावली होती. गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलेली बॅग चोरट्यांनी लांबवली. त्या बॅगेत १६ हजार रुपये आणि औषधी होत्या.

केस : २८जुलै रोजी बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळून एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या सीएमएस या खासगी कंपनीच्या गाडीतून सुरक्षारक्षकाची बंदुकीची बॅग चोरी झाली होती. सुदैवाने ती बॅग दुपारी ४.३० वाजता कोर्ट चौकात सापडली होती. चोरट्यांनी गाडीचालक रवींद्र जाधव याला गाडीच्या मागे पैसे पडल्याचे सांगून त्यांचे लक्ष विचलित करून बॅग लंपास केली होती.

केस : २९जुलै रोजी पुणे येथील भूषण जगताप हे त्यांच्या कारने (क्रमांक एमएच- १२, जीझेड- ६२५१) शहरात आले होते. रात्री ते ९.३० वाजेदरम्यान ते हॉटेल सिल्व्हर पॅलेससमोर गाडी लावून जेवणासाठी गेले होते. त्या वेळी गाडीत चालक संभाजी जगताप बसलेला होता. चाेरट्याने त्याला गाडीचे चाक पंक्चर झाल्याचे सांगून त्याचे लक्ष विचलित केले होते. तो गाडीतून खाली उतरल्यानंतर चोरट्याने गाडीतून दोन लॅपटॉप लंपास केले.