आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध चोरीची मलई खाणारे मोकळेच, बड्या अधिकाऱ्यांचे पाप झाकण्यासाठी कर्मचाऱ्यांचा बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हादूध संघातील चोरीप्रकरणी बड्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी दोन राेजंदारी कर्मचारी आणि टँकरचालकाला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. दूध संघातील चाेरीची मलई खाणारे बडे अधिकारी, राजकीय नेते मोकळेच असून चोरीचे एक मोठे रॅकेट दूध संघात कार्यरत असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अधिकारी आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दूध चोरीप्रकरणी दुग्ध विकास मंत्रालयातर्फे चाैकशी करण्यात येईल, अशी ग्वाही महसूल दुग्ध विकासमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
जिल्हा दूध संघाच्या आवारात शुक्रवारी दूध चोरी करणारा एक टँकर पकडण्यात आला होता. या टँकरमध्ये हजार लिटर दूध असताना त्यातील सुमारे हजार लिटर दूध कमी शिल्लक ठेवून हा टँकर रिकामा करण्यात आला होता. ही चोरी पकडल्यानंतर २४ तास उलटूनही गुन्हा दाखल झाला नव्हता. अखेर शनिवारी राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाकडून (एनडीडीबी) अधिकाऱ्यांचे आदेश आल्यानंतर रात्री उशिरा दोन रोजंदारी कर्मचारी डिगंबर शिरसाळे आणि कार्तिक मोरे टँकरचालक शेख युनूस शेख बाबू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी या तिघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, गुन्हा दाखल होण्यापूर्वी यापैकी दोन रोजंदारी कर्मचाऱ्यांनी "दिव्य मराठी'शी संपर्क साधून दूध संघातील चोरीप्रकरणी खळबळजनक माहिती उघड केली.

नोकरीचे आमिष देऊन केली दिशाभूल
दोन्हीरोजंदारी कर्मचाऱ्यांना शनिवारी गुन्हा दाखल होणार असल्याची कल्पना दिली गेली. आम्ही वाचवून घेऊ, असेही सांगितले गेले. त्यानंतर दोघे कर्मचारी भेदरले, त्यांनी ‘दिव्य मराठी’शी संपर्क साधून दूध संघातील अनेक गैरव्यवहारांची जंत्रीच वाचून दाखवली. खरेतर या दोन्ही रोजंदारी कर्मचाऱ्यांना ‘ऑपरेट’ करणारे एक स्वतंत्र रॅकेट दूध संघाच्या प्रशासकीय ‘सेवे’त आहे. आता त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांचे आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांनी दिलेली माहिती ्शासनाला हादरवून टाकणारी ठरणार आहे.
अशी आहे मोडस ऑपरेंडी
ताब्यातघेतलेले दोन्ही कर्मचारी १३२ रुपये रोजाने काम करीत होते. महिन्यातून १५ दिवस ड्यूटी लागते. मात्र, त्यांना जास्तीत-जास्त दिवस ड्यूटी दिली जात होती. दोघांना महागडे मोबाइल देण्यात आले होते. या मोबाइलवर दुधाच्या आवक मीटरचे फोटो काढून ती माहिती दूध संघातील ‘सेवे’त असलेल्या एका अधिकाऱ्याला पुरवण्याचे काम या दोघांवर सोपविले होते. त्या मोबदल्यात कायमस्वरुपी नोकरीवर घेऊ, असे आमिषही त्यांनादिले होते. गुन्हा दाखल होण्याच्या काही तास आधी संबंधितांनी त्यांच्याकडून मोबाइल परत घेतले. आिण त्यांना मारहाणही केली.
कलेक्शनसाठी आठ लाखांची चारचाकी
आणखीएक रोजंदारी कर्मचारी ‘सेवे’कऱ्यांच्या खास सेवेत रुजू आहे. त्याचाही पगार १३२ रुपये रोज एवढाच आहे. मात्र, त्याच्याकडे लाख रुपयांची चारचाकी, दोन लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी, पुण्यात २५ लाखांचा फ्लॅट अशी प्रॉपर्टी आहे. या चारचाकीत फिरून महिन्यातून तीन वेळा जिल्ह्यातील ‘सेवे’कऱ्यांची ‘सेटिंग’ असलेल्या दूध संकलन केंद्रातून कलेक्शन करायचे. त्याची यथोचित विल्हेवाट लावायची, ही खास जबाबदारी हा कर्मचारी पार पाडतो. याशिवाय दूध संघातील कर्मचाऱ्यांना प्रेमाने रागाने समजावण्याचे कामही त्याच्याकडे साेपवण्यात आले आहे. ‘साहेबाचा माणूस’ म्हणून तो प्रसिद्ध आहे.