आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत करा ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लाडक्या बाप्पाचे सोमवारी धुमधडाक्यात आगमन होणार आहे. गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी सोमवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मुहूर्त आहे. नागरिकांनी गणेश प्रतिष्ठापनेबाबत विनाआधार व्हाॅट्सअॅप मेसेजवर विश्वास ठेवू नये, असा पुरोहितांनी दिला आहे.

गणपती बाप्पाचे घरात सुशोभित आसनावर आगमन करावे. ब्राम्हणांकडून प्रतिष्ठापनेसह बाप्पांची स्थापना करावी. कूळ परंपरेने एक, दोन, तीन, सात अशा जेवढ्या दिवसांची गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येते, त्यानुसार विविध फळे मोदकाचा नैवद्य अर्पण करावा. सकाळी सायंकाळी आरती करावी. आनंददायी, उल्हासी वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा. घरामध्ये अपशब्द, हिंसा, अभक्ष्य भक्षण करू नये. सात्विक वातावरण ठेवावे.
बाप्पाला दररोज सुगंधी फुलांची माला अर्पण करावी. सर्व विद्येचा अधिपती असलेल्या गणरायाला समाजाचे भले करण्याचे मागणे मागावे, असे भिकेश महाराज जोशी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...