आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम.फार्मसाठी आजपासून प्रवेशप्रक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे २०१५-२०१६च्या एम.फार्म (मास्टर ऑफ फार्मसी) अभ्यासक्रमासाठी १७ मे रोजी झालेल्या "एमएएच-एमपीएच-सीईटी' या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे मंगळवारपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे.
जळगाव जिल्ह्यात एम.फार्मसीच्या चार महाविद्यालयांत ५८ जागा आहेत. २३ जून रोजी ‘राउंड १-ए’नुसार स्पॉन्सर्ड गटातील विद्यार्थ्यांना यादीप्रमाणे प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर ‘राउंड २-बी’नुसार खुल्या गटातील विद्यार्थ्यांना २४ ते २६ जूनदरम्यान गुणवत्ता यादीप्रमाणे प्रवेश दिला जाईल. तसेच इतर प्रवर्गांसाठी २७ जूनला प्रवेश दिला जाईल. इच्छुकांनी जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन नोंदणी करावी. २७ जुलैला जागांची यादी जाहीर हाेईल त्यानंतर ‘राउंड २-ए’ सुरू हाेईले. १० जुलैपर्यंत या फेरीतील प्रवेशप्रक्रिया असून, १८ जुलैला रिक्त जागांची माहिती जाहीर हाेईल. २० ते ३० जुलैदरम्यान संस्थात्मक स्तरावरील जागांसाठी प्रवेशप्रक्रियाबाबत माहिती www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
३६ विद्यार्थ्यांना मिळणार थेट प्रवेश
‘एआयसीटीई’तर्फेघेण्यात आलेल्या ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पॅट) उत्तीर्ण ३६ विद्यार्थ्यांना एम. फार्मसीसाठी थेट प्रवेश मिळणार आहे. त्यांना एम.फार्मसीचे शिक्षण घेताना ‘एआयसीटीई’कडून १२,४०० रुपये महिना विद्यावेतनही मिळणार आहे.
विभागातील स्थिती अशी
जळगाव ०४ महाविद्यालये ५८ जागा
धुळे ०४ महाविद्यालये ११६ जागा
नंदुरबार ०२ महाविद्यालये ४३ जागा
नाशिक ११ महाविद्यालये २३३ जागा
अहमदनगर ०७ महाविद्यालये १२९ जागा
एकूण २८ महाविद्यालये ५७९ जागा
बातम्या आणखी आहेत...