आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिन्यांची विसरलेली पर्स फळ विक्रेत्याने लांबवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गणेश कॉलनीतील चौकात फळ खरेदी केल्यानंतर हातगाडीवर विसरलेली दागिन्यांची पर्स विक्रेत्याने लांबवण्याचा प्रय} केला. परंतु पोलिसांच्या मदतीने अवघ्या दोन तासात पर्स परत मिळवली. यात दोन लाखांचे दागिने होते. याप्रकरणी शिरसोली नाका परिसरातील रमजान शेख मुख्तार (वय 33) या विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. वंदना पाटील यांच्यासोबत शनिवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली.
दादावाडी येथील वंदना अनंतसिंग पाटील यांनी सकाळी बॅँकेच्या लॉकरमधून सोन्याचे दागिने काढले होते. त्यानंतर घरी जात असताना त्यांनी गणेश कॉलनी चौकातील शेख याच्या हातगाडीवरून फळ खरेदी केले. फळ खरेदी केल्यावर त्या रिक्षाने दादावाडीकडे निघून गेल्या. घरी गेल्यानंतर पर्स गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुन्हा बॅँक गाठली. मात्र, तेथे पर्स मिळून आली नाही. शेवटी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी फळ विक्रेत्यावर संशय व्यक्त करीत पाटील यांची पर्स परत मिळवली. या पर्समध्ये 1 लाख 96 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, मोबाइल असा ऐवज होता. या प्रकरणी जिल्हापेठ ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दोन पथक करून तपासणी

पाटील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक बाळासाहेब पटारे, दिलीप पाटील, रवी नरवाडे, राजेश मेंढे, अनिल पाटील, विनय नेरकर, अल्ताफ पठाण यांनी दोन पथक तयार करून शोध सुरू केला. एका गटाने बॅँकेत तपासणी केली. तर दुसर्‍या पथकाने फळ विक्रेता शेख याच्यावर संशय व्यक्त करीत त्याची विचारपूस केली. शेख याने पर्स आपल्या हातगाडीवर राहिली नसल्याचे सांगितले. त्याला पोलिस ठाण्यात आणून खाक्या दाखवल्यानंतर त्याने पर्स काढून दिली. दुकानाच्या परिसरातच असलेल्या गोडाऊनमध्ये त्याने पर्स लपवली होती.