आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेहरूणच्या चौपाटीकरणातून बड्यांना एफएसअायचा लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्य शासन लाेकसहभागातून करण्यात येणाऱ्या मेहरूण तलावाच्या चौपाटीकरणामागे (खाेलीकरण मजबुतीकरण) याच परिसरातील प्रभावशाली व्यक्तींना वाढीव एफएसअायचा फायदा करून देण्याचा प्रयत्न अाहे. यात माेठ्याप्रमाणात पर्यावरणाची हानी हाेणार असून पाणीचाेरीचा संशय अारटीअाय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी राज्यपालांकडे केलेल्या तक्रारीत व्यक्त केला अाहे. या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चाैकशी करून एक महिन्यात सत्य उजेडात अाणावे, अशी मागणी करण्यात अाली अाहे.
गेल्या दाेन महिन्यांपासून मेहरूण तलावाच्या खाेलीकरणाचे काम जलसंपदा विभाग महापालिकेने हाती घेतले अाहे. सुमारे ३२ हजार ब्रासपेक्षा जास्त गाळ काढून ताे तलावाच्या काठावर टाकून मजबुतीकरण करण्यात येत अाहे. त्यामुळे तलावाच्या काठावर सुमारे ८० फुटांचा नवीन रस्ता तयार केला जात अाहे. तलावाच्या बांधाचे काम अाता वादाच्या भाेवऱ्यात सापडले अाहे. अशा पद्धतीने करण्यात येणाऱ्या मजबुतीकरणामागे मेहरूण परिसरात मालमत्ता असलेल्या माेठ्या धनदांडग्यांना वाढीव चटई क्षेत्राचा (एफएसअाय) लाभ व्हावा हा हेतू असल्याची तक्रार अारटीअाय कार्यकर्ता गुप्ता यांनी व्यक्त केली अाहे. सहा मीटर रस्त्यांना अाता वाढीव एफएसअाय मिळणार नसल्याने तलावाच्या काठावर चाैपाटीच्या नावाने रस्ता रुंदीकरण करून याच परिसरातील मालमत्ताधारकांना त्याचा वाढीव एफएसअायचा लाभ मिळवून देण्यासाठी ही खटपट असल्याचेही गुप्तांचे म्हणणे अाहे. यात महापालिकेशी निगडित काही प्रभावशाली व्यक्तींचाही समावेश असून त्यांना फायदा मिळावा हाच हेतू अाहे. या कामादरम्यान मेहरूण परिसरातील सुमारे हजार हिरव्या झाडांची कत्तल केली जाणार अाहे. तसेच काही वर्षांपूर्वी या तलावातून शहराला पाणीपुरवठा केला जात असल्याने अाताही काही उद्याेगांसाठी पाणीचाेरी हाेत असल्याची शंका व्यक्त करत यात जिल्हाधिकारी कार्यालय महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचा अाराेपही गुप्तांनी केला अाहे.

जिल्हा परिषद ते रेल्वेस्थानक राेड
शहरातीलजिल्हा परिषद ते रेल्वे स्थानकापर्यंतचा रस्ता २०१४ मध्ये रुंदीकरण करायचा असल्याने डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी मार्केटच्या लहान दुकानदारांना स्थलांतरीत करण्यात अाले हाेते. या रस्त्यावर काही प्रभावशाली व्यक्तींचे प्लाॅट असल्याने त्यांना एफएसअाय वाढवून मिळण्यासाठी गरीब दुकानदारांना हटवण्यात अाले.

परंतु अद्याप ही महापालिकेने या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण केलेले नाही. यासंदर्भात महापालिकनेे अाैरंगाबाद खंडपीठातही प्रतिज्ञापत्र ही दिले अाहे. राज्यापालांनी अापल्या अादेशाने हा रस्ता रुंदीकरण करण्याचे अादेश देण्याची विनंती दीपक गुप्ता यांनी केली अाहे.

समितीच्या माध्यमातून चाैकशीची मागणी
निधीशासनाचा खर्च हाेत असल्याने या प्रकरणाच्या चाैकशीसाठी एक समिती गठित करून त्यात मंत्रालय स्तरावरील अधिकारी, विभागीय अायुक्त, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पाेलिस अधिकारी, भूजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांचा समावेश करावा, चाैकशीनंतर येणारा अहवाल हा सार्वजनिक करण्यात यावा, दाेषींवर कडक कारवाई करण्याची तसेच समितीने एक महिन्यात चाैकशी पूर्ण करण्याची मागणी करण्यात अाली अाहे. मेहरूण तलावाच्या पाणी स्त्राेताची अाजच्या स्थितीतील संपूर्ण माहिती, अाजचे पूर्वीचे क्षेत्रफळ यासारख्या लहान सहान बाबींची माहिती गाेळा करणे गरजेचे असल्याचेही तक्रारीत म्हटले अाहे.
बातम्या आणखी आहेत...