आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले मार्केटच्या गाळेधारकांना हवाय एकूण ९९ वर्षांचा करार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलांतील गाळ्यांसंदर्भात दाेन धाेरणात्मक निर्णय घेतले जाणार अाहेत. त्यादृष्टीने अाता व्यापारी प्रशासकीयपातळीवर जाेरदार हालचालींना वेग अाला अाहे. व्यापाऱ्यांनी मार्च महिन्यात केलेल्या एकूण ९९ वर्षांच्या कराराच्या मागणीवर तब्बल अाठ महिन्यांनी अहवाल मागवण्यात अाला अाहे. महसूलमंत्री एकनाथ खडसेंना प्राप्त निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेकडून सविस्तर अभिप्राय मागवला अाहे.

गेल्या तीन वर्षांपासून शहरातील पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील दाेन हजार १७५ गाळ्यांच्या कराराचा मुद्दा गाजत असून चर्चा अाणि निर्णयाचे गुऱ्हाळ सुरूच अाहे. दाेन दिवसांपूर्वीच महासभेच्या ठराव क्रमांक १३५ वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाेन वेगळे मार्ग सुचवले अाहेत. शासकीय जमिनीवरील गाळ्यांचा निर्णय शासन घेणार असल्याने महसूल विभागाचा अभिप्राय मागवण्यात अाला अाहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या सूचनेनुसार मार्च २०१५ मध्ये दिलेल्या पत्रावर अभिप्रायासह प्रस्ताव पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला पाठवलेल्या एका पत्रात ९९ वर्षांच्या कराराबाबत अापला अहवाल मागवला अाहे.

पालिकेचा अहवाल महत्त्वाचा
गाळेधारकांनी९९ वर्षांच्या कराराच्या केलेल्या मागणीवर महापालिकेचा अहवाल मागवण्यात अाला अाहे. शासनाच्या दृष्टीने फुले मार्केटची जागा महसूल विभागाची अाहे; तर महापालिकेच्या सूत्रांनुसार ही जागा निरंतर कालावधीसाठी पालिकेला दिली अाहे. त्यामुळे या जागेवरील बांधलेला इमला त्यातील गाळ्यांचा निर्णय हा पालिकेनेच घेणे गरजेचे अाहे. त्यामुळे महापालिका काय अहवाल देते? हे महत्त्वाचे ठरणार अाहे.

अामदार डाॅ.जगवानी यांनी गाळेधारक अर्जदारांनी दिलेल्या निवेदनासह अापले निवेदन महसूलमंत्री एकनाथ खडसेंना १० मार्च २०१५ राेजी दिले हाेते. त्यानंतर त्यावर अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे अादेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात १७ मार्च २०१५ राेजी प्राप्त झाले. यासंदर्भात अहवालासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने मनपाला १८ नाेव्हेंबर २०१५ राेजी पत्र दिले. महसूल उपायुक्तांनी १९ नाेव्हेंबरला ते नगररचनाात अहवाल देण्यासाठी रवाना केले अाहे.

असा झाला पत्राचा प्रवास
काय अाहे आमदारांच्या पत्रात?
विधानपरिषदेचे अामदार डाॅ.गुरुमुख जगवानी यांना फुले मार्केटमधील गाळेधारकांनी िनवेदन दिले हाेते. त्याच निवेदनाच्या अाधारे डाॅ.जगवानी यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसेंना निवेदन दिले. त्यात महात्मा फुले सेंट्रल फुले मार्केट असलेल्या नगर भूमापन क्रमांक १९३८-३७-ब-१ ही २१ हजार ३२८.६० चाैरस मीटर जमीन महाराष्ट्र शासनाच्या मालकीची अाहे. सन १९१० पासून जमीन गाळेधारकांचे पूर्वज त्या ठिकाणी टपरी, हातगाडी अादींच्या माध्यमातून उपजीविका भागवत हाेते. त्यामुळे ती जमीन त्यांच्याच ताब्यात हाेती. त्यानंतर ती जमीन अर्जदारांच्या ताब्यात अाली अाहे. कालांतराने जमीन ब्रिटिश गव्हर्नमेंटने सन १९२९ मध्ये ३० वर्षांकरिता लेखी कराराद्वारे तत्कालीन जळगाव नगरपरिषदेस भाडेतत्त्वावर दिली हाेती. जागेवर गाळेधारक अर्जदारांच्या उपजीविकेचे साधन असून ती जागा प्रत्यक्ष गाळेधारकांच्या ताब्यात असल्याने ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर करारनाम्याने करून द्यावी, अशी मागणी केली अाहे.

तत्काळ चाैकशी करा
महसूलमंत्रीएकनाथ खडसेंच्या पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवले अाहे. याप्रकरणी तत्काळ सखाेल चाैकशी करून अावश्यक त्या कागदपत्रांसह अभिप्राय अहवाल देण्याचे अादेश केले अाहेत. महापालिका अायुक्तांनाही तातडीने अहवाल देण्याचे अादेश करण्यात आले अाहेत.