आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजी-आजोबांची भरली शाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर. आर. शाळेत आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित असलेले १९७०-७१च्या बॅचचे विद्यार्थी. - Divya Marathi
आर. आर. शाळेत आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित असलेले १९७०-७१च्या बॅचचे विद्यार्थी.
जळगाव- आर. आर. शाळेत १९७० -७१ या वर्षी दहावीत शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यास शनविारी सुरुवात झाली. तब्बल ४५ वर्षांनी सगळेजण एकत्र आले. यातील बहुतांश जण नविृत्त झालेले आहेत. सगळ्यांनी गत आठवणींना उजाळा देत शाळेप्रती ऋण व्यक्त कोले. आपापले अनुभव शेअर केले. काहींनी तर पत्नी, मुले, नातवंडांसह शाळेत हजेरी लावली. तसेच या वेळी ४५ वर्षांपूर्वी शाळेच्या मधल्या सुटीत ज्यांच्याकडून खाऊ घ्यायचे, अशा ८५ वर्षीय चिंतामणी सोनार यांचा गोरव करण्यात आला. त्यांनी चणे विकून आपल्या मुलांना प्राध्यापक, इंजनिीयर हॉटेल व्यावसायिक केले.
अध्यक्षस्थानी अरविंद लाठी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक बा.आ. लोखंड, अवनिाश लाठी, मुकुंद लाठी, सुधाकर भोळे, अरुण दीक्षित, प्रतिभा पाटील, श्रद्धा लाठी, मुख्याध्यापक डी.एस. सरोदे, अनिल चव्हाण, पंकज कुलकर्णी, सोनाली रेंभोटकर उपस्थित होते. माजी शिक्षक एस.डी. चौधरी, बा.आ. लोखंडे, यू.सी. मारवाडी, व्ही.आर.वाणी, के.आर.भोळे, एल.डी.लोखंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर माजी विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालयाच्या रेखा सोंडूर बलदोटा, नविृत्त अधीक्षक अभियंता व्ही.एन.पाटील, सचवि दिलीप लाठी, उद्योजक संजय खानझोडे, चार्टर्ड अकाउंटंट सत्यनारायण मणियार, दहाड पॅटर्नचे संचालक रवींद्र दहाड, हिरा पाइप उद्योग समूहाचे धनंजय खडके यांचाही गोरव करण्यात आला.

मुलांनीही अनुभवली वडिलांची मैत्री
नाशिकयेथील माजी विद्यार्थी सुनील वडनेरे यांची पत्नी, मुलगा मुलीसह संपूर्ण परविार आला होता. या वेळी त्यांची मुलगी सायली वडनेरे ही म्हणाली की, आता आम्ही मित्र- मैत्रिणी नेहमी भेटत असतो. पण हे सर्व लोक इतक्या वर्षानंतर भेटूनही त्यांची मैत्री किती घट्ट आहे. किती चांगली, छान आहे. म्हणजे तुमचा रोज संवाद असो वा नसो, मनात प्रेम, मैत्रीची भावना असेल तर ती चिरतरुण राहत असते.

वेगळाच अनुभव
त्यावेळेस शाळेत आम्ही २५ ते ३० मुली होतो. आज जणी आल्या आहेत. काहींचे तर पहिले नावही बदलले, आडनावासह. वेगळाच अनुभव आहे. माझ्या बहिणीशी संपर्क साधून माझ्याशी संपर्क साधला. त्यामुळे खूप मेहनत या कार्यक्रमास घेतली आहे. शुभांगीफडके, स्पिचथेरपिस्ट, मुंबई

चित्रकला आवडता विषय
चित्रकलामाझा आवडता विषय शाळेत होता. त्या वेळेस मेहरूण तलावात बाेट बुडून आठ मुलांचे निधन झाले होते. चित्रकला स्पर्धेत मी चित्र काढले मला बक्षीस मिळाले. शाळेत आल्यावर तीच आठवण परत आली. अरुणतांबटकर, नविृत्तअसिस्टंट इंजनिीयर. एमईसीबी

चित्रकला नावडता विषय
खूपवर्षानंतर भेट होतेय. १२ वर्षे मी रिक्षा चालवली हळूहळू व्यवसाय वाढवला. सगळे मित्र भेटल्याचा आनंद वेगळा असतो. शाळेत चित्रकला माझा नावडता विषय होता. त्या सरांनी मला बदडले अन‌् मी आजारी पडलो, तेच घरी आले. नंतर चित्रकलेकडे पाहिले नाही. सुधीरगांगुर्डे, व्यावसायिक

अत्यंत सामान्य विद्यार्थी
अत्यंतसामान्य विद्यार्थी आहे. खूप चांगले गुण मिळाले नाहीत. पण शिक्षण चांगले मिळाले. पत्नी उषाच्या प्रोत्साहनाने चांगल्या नोकरीस लागलो. उपजिल्हाधिकारी म्हणून नविृत्त झालो. मी नात शाैर्या, मुलगी भारती पत्नी प्रा.डॉ. उषा सपकाळेसह आलो आहे. रवींद्रसपकाळे, निवृत्तअधिकारी

जुन्या स्मृतींना उजाळा
रेखाबलदोटा यांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. यात धर्माधिकारी सरांनी अंक प्रकाशित केला. यामध्ये वर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे लेखन चांगले आणि अक्षर चांगले आहे, त्यांचा समावेश केला. त्याचे मुखपृष्ठही मुलांनीच केले होते. या उपक्रमांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाल्याचे सांगितले. सत्यनारायण मणियार यांनी आम्ही जेव्हा शाळा सोडून गेलो तेव्हापासून ते आतापर्यंत शाळा जशीच्या तशीच आहे. चंद्रावर ज्या वेळेस माणसाने पहिले पाऊल ठेवले होते. तो क्षण शाळेत एका कार्यक्रमासारखा साजरा झाला होता. सुतकताईच्या तासाला कोणाचे सर्वात जास्त सुत काढले जाईल, याचीही स्पर्धा लागायची. अशा अनेक आठवणी जवळ असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...