आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद गणेशला अखेरचा सलाम; वडाळा-वडाळी येथे अंत्यसंस्कार, चिमुरड्याने दिला मुखाग्नी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - देशभक्तीने भारावलेले वातावरण... कुटुंबीयांच्या डोळ्यांतून फुटलेला अश्रूंचा बांध, पंचक्रोशीतील उपस्थित हजारोंचा शोकाकुल जनसमुदाय हे चित्र वडाळा-वडाळे या शूर सैनिकांची परंपरा असलेल्या गावाने दुस-यांदा अनुभवले.
गौरीकुंड येथे यात्रेकरूंना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढताना हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले जवान गणेश अहिरराव यांच्या पार्थिवाला सहावर्षीय चिमुरड्याने मुखाग्नी दिला. घटनेनंतर नवव्या दिवशी गणेश यांचे पार्थिव गावात आले. मंगळवारी सायंकाळी पार्थिव चाळीसगाव येथे पोहोचल्यानंतर अंतिम दर्शनासाठी रात्रभर रीघ लागली होती. बुधवारी सकाळी पार्थिव सजवलेल्या रुग्णवाहिकेतून गावात आणले. सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.