आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिकांच्या संवादाची विनोदी स्वरुपात होतोये व्हॉट्सअॅपवर चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सध्या छोट्या पड्यावरील मराठी मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. घराघरात कुटुंबाचाच एक भाग म्हणून आज प्रत्येक मालिकेकडे पाहिले जाते. या मालिकांमधील विनोदी संवाददेखील अनेकांचे तोंड पाठ झाले आहेत. सध्या सोशल मीडियावरही मराठी मालिकांचा फीव्हर चढला असून मालिकांवरील विनोदांनी व्हॉट्सअॅप सध्या भरलेले आहे. अनेक ग्रुपवर या विनोदांची जोरात चर्चा सुरू असते. मालिकांच्या पात्रांवर चांगलेच विनोद रंगू लागले आहेत.
मालिका ज्याप्रमाणे पुढे सरकते त्याप्रमाणे या विनोदांमध्येही बदल होताना दिसत आहेत.
चित्रपटाच्या दुनियेत अनेक चित्रपट त्यातील संवादांमुळे खूपच गाजले आहेत; हे संवाद आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यांच्यासह आतापर्यंत अक्षय कुमार, अजय देवगण आणि सलमान खान यांचे काही खास संवाद प्रेक्षकांनी मनात साठवून ठेवले आहेत. चित्रपटानंतर आता मराठी मालिकांचे संवादही प्रेक्षकांच्या मनावर रुळायला लागले आहेत.
सोशल मीडियातून लोकप्रिय
मराठी मालिकांसह हिंदी मालिकांचेही अनेक जण चाहते आहेत. त्यामुळे या मालिकांमधीलही संवाद घेतले जातात. यात खासकरून सीआयडीचा नंबर लागतो. सीआयडीमधील अनेक संवाद हे लोकप्रिय झाले असल्याने विनोदांमध्ये या संवादांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मालिकांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळत आहे.
'जान्हवी-श्री' ची मजा
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील सात सासवांची एकटी लाडकी सून असलेली जान्हवी आणि तिचा लाडका पती श्री यांच्यावरील विनोद सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येताेय. त्यांचे काही फेमस असलेले संवादही यात वापरले जातात. मालिकेतील काही पात्रांचे संवाद हे ठरलेले आहेत किंबहुना प्रेक्षकांच्या त्यांच्या संवादानंतरच्या प्रतिक्रिया काय असतील हे सुद्धा तोंडपाठ झाले आहे. एकमेकांच्या संवादातही ‘काय हं श्री’,‘कला गप्प बस...’ यासारखे संवाद लोकप्रिय होताना दिसत आहेत.