आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gadge Maharaj Night's Accommodation 'latest News,Divya Marathi

राष्ट्रसंत गाडगे महाराज रात्री यात्री निवास’ चार वर्षांपासून पडलाय धूळ खात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-मुख्य बसस्थानकाशेजारी पालिकेने ‘रात्री यात्री निवास’ बांधून ठेवले आहे. चार वर्षांपासून धूळ खात पडलेली ही वास्तू एखाद्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून किंवा पालिकेच्या यंत्रणेमार्फत सुरू करता येणे शक्य आहे; मात्र प्रशासकीय उदासीनता आणि आर्थिक अस्थिरतेच्या फेर्‍यात या चांगल्या उपक्रमाकडे पालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
बसस्थानकावर गाडी चुकल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे प्रवाशांना थांबण्याची वेळ आल्यास त्याच ठिकाणी झोपावे लागते. अशा वेळी महिला किंवा बालके सोबत असल्यास त्यांची अजूनच गैरसोय होत असते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेतर्फे भजे गल्लीत ‘राष्ट्रसंत र्शी.गाडगे महाराज रात्री यात्री निवास’ बांधण्यात आले आहे. या वास्तूचे बांधकाम पूर्ण होऊन 12 ऑगस्ट 2009 रोजी उद्घाटनही झाले आहे. तत्कालीन महापौर रमेश जैन, उपमहापौर राखी सोनवणे, स्थायी समिती सभापती विष्णू भंगाळे, बांधकाम सभापती अनिल वाणी व तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा थाटात पार पडला होता. परंतु उद्घाटनानंतर ही वास्तू धूळ खात पडली आहे.
फेरनिविदा लालफितीत
एखाद्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा रात्री यात्री निवारा सुरू करण्याच्या हालचाली वर्षभरापूर्वी झाल्या होत्या. त्यासाठी दोन-तीन संस्थांनी पुढाकारही घेतला होता; मात्र प्रशासनाच्या अटी-शर्तींमुळे त्या वेळी हे काम मार्गी लागले नव्हते. तसेच ही वास्तू नागरिकांच्या वापरात येण्यासाठी पुन्हा फेरनिविदा काढण्याचेही ठरले होते; परंतु त्यावरही नंतर काही झालेले नाही.