आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेश विसर्जन मिरवणुकीत महिलांचा सहभाग वाढवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गणरायालानिरोप देण्यासाठी शहरातील गणेशभक्त सज्ज झाले आहेत. सोमवारी होणा-या विसर्जन मिरवणुकीत विविध समाजप्रबोधनपर देखावे आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून मुंबई, पुणे या मेट्रोसिटीप्रमाणेच मिरवणुकांमध्ये महिला, युवतींचे ढोल पथक त्यांचा सहभाग वाढवण्याचा ठरावही शनिवारी झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत केला.
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांची दुरुस्तीसह मार्गावर सुरक्षेसाठी कठडे लावण्यात यावी, ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची व्यवस्था करावी, असा ठरावही झाला. मिरवणुकांमध्ये पथसंचलन, प्रात्यक्षिकांसह महिला युवतींचा सहभाग वाढवण्यासाठी आवाहन करण्याचेही या वेळी ठरले. मिरवणुकांमध्ये मंडळामधील अंतर दूर करण्यासह महिलांना सहभागी करून घेण्याचे कार्यही केले जाणार आहे. यासाठी शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी पुढाकार दर्शवला आहे.
महिला ढोल पथक देणार सलामी
शहरातील२५ वर्षे पूर्ण झालेल्या मंडळांचा उत्साह वाढवण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत महिला पथक ढोल वाजवणार आहेत. यासाठी शहरात तीन ते चार ठिकाणी महिला ढोल पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यासंबंधीचे नियोजनही बैठकीत करण्यात आले.
मनसेतर्फे लाखांचे सुरक्षा कवच
मनसेएल.के. फाउंडेशनतर्फे विसर्जनासाठी मेहरूण तलाव, गिरणा पंपिंग येथे नियुक्त असलेल्या मनपा कर्मचाऱ्यांचा लाखांचा अपघाती विमा काढण्यात येणार आहे. यासह कर्मचा-यांना गणवेश वाटप केले आहे.
गिरणानदीपात्रात विसर्जनास बंदी...
निमखेडीशिवार गिरणा नदी विसर्जनाच्या दृष्टीने धोक्याचे असल्याने तेथे विसर्जनास बंदी घातल्याचे पालिकेने कळवले आहे. मंडळांनी याठिकाणी रस्ता नसल्याने तेथे विसर्जन करू नये, असे आवाहनही केले आहे.