आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणरायाचा मार्ग ‘खडतर’; भुसावळात जीवघेणे खड्डे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील मार्गांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी पालिकेने कोणत्याही उपाययोजनांना प्राधान्य दिलेले नाही. या मुळे 9 सप्टेंबरपासून भक्तांकडे येणार्‍या गणरायाचे आगमनही ‘खडतर’ मार्गांवरूनच होण्याची चिन्हे आहेत.

शहरातील जामनेर रोड, जळगाव रोड, यावल रोड आणि वरणगाव रोड या मुख्य मार्गासह शहरातील मॉडर्नरोड, आठवडे बाजार रोड , बसस्थानक रोड, मामाजी टॉकीज रोड या मार्गांची अवस्था बिकट झाली आहे. पावसाळय़ात या मार्गांची अवस्था आणखीच खालावल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील रस्त्यांवरच्या खड्डयांमुळे अपघातातून तीन वाहनधारकांना जीव गमवावा लागला. तरीही पालिका प्रशासनाने या समस्येकडे कानाडोळा केला आहे. येत्या 9 सप्टेंबरला शहरातील सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. मात्र, पालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी अद्याप कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. या मुळे शहरातून श्रीची मूर्ती स्थापनेच्या ठिकाणापर्यंत सुरक्षित न्यावी कशी? असा प्रo्न उपस्थित झाला आहे. मंडळाचे पदाधिकारी सुद्धा चिंतीत आहेत.