आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणशोत्सवात जळगावात रात्री 12 वाजेपर्यंत वाद्य वाजणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गणेशोत्सवात केवळ चार दिवस रात्री 12वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे गणेशभक्तांसह सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा मिळणार आहे.

महापालिका निवडणुकांमुळे गणेशोत्सवाकडे फारसे लक्ष नसले तरी सार्वजनिक गणेश मंडळे दरवर्षाप्रमाणे यंदाही कामाला लागले आहेत. पेठभागातील मंडळांनी मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळाच्या महामंडळाकडून पोलिस प्रशासनाकडे मागणी करूनही शेवटचे दोन-तीन दिवस मंजुरी दिली जाते. यंदा जिल्हाधिकार्‍यांनी गणेशोत्सवापूर्वीच चार दिवसांची परवानगी दिली आहे.

गणेशोत्सवात पाचवा दिवस (13 सप्टेंबर), सातवा दिवस (15 सप्टेंबर), नववा दिवस (17 सप्टेंबर), शेवटचा दिवस (19 सप्टेंबर) हे चार दिवस सायंकाळी सहा वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात र्शोतेगृह, सभागृह, सामूहिक सभागृह आणि मेजवानी कक्ष या जागा सोडून परवानगी दिली आहे.