आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश उत्सवात यंदा नारीशक्तीचा बाेलबाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सार्वजनिक गणेशोत्सवात पुरुष आणि युवकांचा माेठ्या प्रमाणात सहभाग असताे. या उत्सवात महलिाचा सहभाग वाढावा, यासाठी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने पुढाकार घेतला आहे. यंदा गणेशोत्सव कार्यकािरणीत, वसिर्जन मिरवणुकीसह प्रत्येक उपक्रमात महिलांना प्रथम स्थान दिले जाणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयाेजनदेखील करण्यात येणार आहे.

‘चूल अन् मूल’ यामध्ये अडकलेल्या स्त्रियांना इच्छा असूनदेखील सार्वजनिक उत्सवात सहभागी हाेत नाही. त्यामुळे त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळत नाही. मुंबई, पुण्यात विविध उत्सवात महलिाच पुढे असतात. तसे चित्र जळगावात पाहण्यास मिळत नाही. यासाठी सार्वजनिक उत्सवात महिलांचा माेठ्या प्रमाणात सहभाग वाढावा, यासाठी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने यंदा ‘जरा हटके’ उपक्रम राबवण्याचा निश्चय केला आहे. ते गणेशोत्सव काळात महिलांना प्रत्येक उपक्रमात सहभागी करून घेणार आहेत. त्यामुळे ज्या महलिा, महलिा सामाजिक संस्था, मंडळांना महामंडळाच्या गणेश वसिर्जन मिरवणूक संचलनात, नियाेजन, कार्यकारणिीत सहभागी हाेण्याची इच्छा आहे, अशा महिलांनी महामंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
महिलांच्या कलागुणांना वाव
अनेक मेट्राे सिटीत, माेठ्या शहरात महिलांचे ढाेल, लेझीम पथक आहेत. मंडळेसुद्धा महिलांचीच आहेत. ती मिरवणुकीतही सहभागी हाेऊन प्रात्यक्षिक दाखवितात. शहरातील महिलांना संधी मिळावी, त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे शहरातील उत्सव संस्कारशील हाेईल.
सचिन नारळे, प्रकल्प प्रमुख, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ
स्थानिक मंडळांनी घ्यावा सहभाग
गणेश मंडळांतर्फे अथर्वशिर्ष पठण, सामािजक उपक्रम आयाेजित केले जातात. यात त्यांनी महिलांना सहभागी करून घ्यावे. तसेच आपल्या कार्यकारणिीतही त्यांना सहभाग द्यावा, असे महामंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १० दवसिांत महिलांना रांगाेळ्या काढायच्या असतील, महलिा सुरक्षा, कायदेविषयक पाेस्टर प्रदर्शन काेणाला लावायचे असेल, जनजागृती पर कार्यक्रम करायचा असेल, त्यांना महामंडळातर्फे गणेश मंडळाची जागा उपलब्ध करून दलिी जाणार आहे. शहरात तयार हाेणाऱ्या महलिा ढाेल पथकासही संधी देण्यात येणार आहे.