आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक गणपतीसाठी सरसावल्या शाळा अन‌् विद्यार्थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातीलविविध शाळांनी ‘दिव्य मराठी’तर्फे राबवण्यात येत असलेल्या शाडू मातीचा गणपती बसवण्याच्या अभियानास प्रतिसाद देत पर्यावरणपूरक गणपती बनवण्याच्या कार्यशाळांचे अायाेजन केले हाेते. या अंतर्गत विद्यार्थ्यांना गणपती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात अाले. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी शाडू मातीचे गणपती बसवावे, असा संदेश या वेळी देण्यात अाला.
नंदिनीबाईवामनराव विद्यालय
यातराष्ट्रीय हरीतसेनेतर्फे पर्यावरण पूरक शाडू मातीचे गणपती बनवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थिनींना देण्यात अाले. प्रसंगी प्राचार्या वाय.एस.साेनवणे, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, प्रसन्न वारके, अर्चना चाैधरी, सुलभा राणे, भारती राणे, नीलेश चाैधरी, गिरीश भारंबे उपस्थित हाेते. डाॅ. तुषार फिरके, काजल फिरके यांचे सहकार्य िमळाले. पी.एम.जंगले, मंगला जंगले उपस्थित हाेते. एस.के.वानखेडे यांनी इंधन बचतीवर मार्गदर्शन केले.
अभिनवअध्यापिका विद्यालय
यासराव पाठशाळेत १ली ते वीच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीचे गणपती बनवले. त्याचप्रमाणे प्रत्येक वयाेगटानुसार विद्यार्थ्यांना मातीच्या वस्तू बनवण्याचे विषय देण्यात अाले हाेते. यात अाकर्षक सुबक महादेवाची मूर्ती, कार्टून मूर्ती विद्यार्थ्यांनी बनवल्या. तर लहान वयाेगटाच्या मुलांनी विविध फळे, बाहुल्यादेखील बनवल्या.
रावसाहेबरुपचंद विद्यालय
अार.अार.माध्यमिकउच्च माध्यमिक विद्यालय, न्यू इंग्लिश मीिडयम स्कूलतर्फे घेण्यात अालेल्या पर्यावरण पूरक गणपती कार्यशाळेचा समाराेप करण्यात अाला. यात १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदवला. वि‍िद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शाडू मातीच्या गणेश मूर्ती मनाेवेधक अाकर्षक ठरल्या. मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्तींचे काैतुक करण्यात अाले. प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश लाठी, श्रद्धा लाठी, डी.एस.सराेदे, प्राचार्य पंकज कुळकर्णी, मार्गदर्शक बन्सीलाल सुतार उपस्थित हाेते.
सिग्नेटस्कूल
शाळेतपर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा पार पडली. यात शाडूच्या मातीचे गणपती बनवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात अाले. तसेच गणपती कसे घडवावे, याचे महत्त्व काय? यावर मार्गदर्शन करण्यात अाले. संस्थेचे अध्यक्ष मनीष कशुरीया यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा घेण्यात अाली. मुख्याध्यापिका कृष्णा कशुरीया उपस्थित हाेते.
काशिनाथपलाेड स्कूल
शाळेतशाडू मातीचे गणपती बनवण्याची स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी अायाेजित करण्यात अाली हाेती. यात प्लॅस्टर अाॅफ पॅरिसमुळे पर्यावरणाचे हाेणारे नुकसान अाणि त्यावर याेग्य उपाय म्हणजे शाडू मातीची मूर्ती बसवण्याचे सांगितले. यासाठी मुलांमधील मूर्तिकला शिल्पकलेला प्राेत्साहन देण्यासाठीच या स्पर्धेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यामध्ये वी ते १० वी च्या १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदवला. गणेशाच्या शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या. तसेच घरीदेखील याच मूर्ती स्थापन करण्याचा संकल्प घेतला. या वेळी प्राचार्य सुहास मुळे उपस्थित हाेते.