आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांचा माज अाणि मद्याची धुंदी... यांना नाही बाप्पाचीही भीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिडीस प्रकाराचे प्रदर्शन
मिरवणुकीतनाचतांना अापल्या अानंदाचे प्रदर्शन करत, काही कार्यकर्ते ढाेल वाजवणाऱ्यांच्या ताेंडात दहाच्या नाेटा काेंबून अापल्याच मस्तीत नाचत हाेते.
अाधीच प्यालेल्याला पुन्हा आग्रह
मिरवणुकीतमद्यपान करू नये असे असतांना अाधीच मद्याच्या धुंदीत ‘मस्त’ झालेल्या या व्यक्तीला कार्यकर्त्यांनी मिरवणूकीतच पुन्हा मद्यपानाचे निमंत्रण दिले.

विसनजीनगरातील अष्टविनायक गणेश मंडळांचे कार्यकर्ते गणरायाला अाणण्यासाठी दुपारी दाेन वाजेच्या सुमारास सेंट्रल फुले मार्केटमध्ये अाले. या वेळी मंडळांतील एका कार्यकर्त्याने पैशांच्या माजाचे असे प्रदर्शन केले. पाेटाची खळगी भरण्यासाठी ढाेल पिटणाऱ्यांच्या ताेंडात ते दहाच्या नाेटा काेंबत हाेते. मानवाच्या जीवनातील विघ्न हरण्याचे साकडे घालण्यासाठी स्थापना हाेणाऱ्या गणरायाच्या मिरवणुकीतच अनेक कार्यकर्ते मिनरल वाॅटरच्या बाटलीत अाणलेले मद्य प्राशन करीत हाेते.