आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज येणार लाडका बाप्पा : मंगलमय उत्सव "श्रीं'च्या स्वागतासाठी जिल्हाभरात जय्यत तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लाडक्या बाप्पाचे शुक्रवारी आगमन होत असून गणरायाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले आहेत. जिल्हाभरात यंदा २०५५ खासगी, सार्वजनिक गणेश मंडळांची नोंद झाली. गुरुवारी प्रत्येक मंडळाची तयारी पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू होती. गणेशोत्सव काळात अनुिचत प्रकार घडू नये म्हणून पोिलस प्रशासनाने जिल्हाभरात कडक पोिलस बंदोबस्त तैनात केला आहे. तर जळगाव शहरात चौकाचौकांत सीसीटीव्ही, कंट्रोल रूम उभारण्यात आले आहे.
जळगाव येथील विसनजीनगरातील इच्छापूर्ती गणरायाची मूर्ती.
गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानावर बांधण्याकरिता नारळ, आंब्यांचे डहाळे किंवा तोरण. पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, निरांजन, शंख, घंटा, हळद, कुंकू, अबीर, शेंदूर, गुलाल, रांगोळी , दुर्वा, तुळशी, बेल, विड्याची पाने, सुपाऱ्या, विविध प्रकारची फुले, पत्रपूजेसाठी वेगवेगळी पत्री, पंचामृत, वस्त्र, जानवीजोड, उदबत्ती, कापूर, खारीक, बदाम, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक किंवा मिठाई.
गणेशोत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त दाखल झाला आहे. यंदा गुजरातहून बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची एक तुकडी मागवण्यात आली आहे. पहिल्यांदाच गणेशभक्त तथा मिरवणुकीतील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या आरोग्याची काळजी करीत शहरातील सुभाष चौक, नेहरू चौक आणि सरस्वती डेअरीजवळ अॅम्बुलन्स उभी करण्यात येणार आहे. जळगाव शहरात सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवात भारनियमन बंद ठेवण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी वीज महावितरण कंपनीने घेतला. उत्सवासाठी २९ ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान ते ग्रुपपर्यंत कुठेही रात्रीच्या वेळेत भारनियमन करू नयेत, अशा सूचनाही कंपनीने दिल्या आहे. या निर्णयामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे.

गणरायाच्या मूर्तीची प्रशस्थ ठिकाणी शक्यतो पूर्वाभिमूख स्थापना करावी. त्यानंतर पूजेचे सािहत्य घ्यावे. नंतर दोन वेळा आचमन करून प्राणायाम करावा. हातात अक्षता, उदक (पाणी) घेऊन देश-काळाचा उच्चार करून "मम सकुटुंबस्य क्षेमस्थिती आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्धी' सर्वकाम निर्विघ्न सिद्धी, पुत्रपौत्र धनधान्य समृद्धीद्वारा प्रतिवार्षिक विहितम् श्री सिद्धिविनायक देवताप्रीत्यर्थ ध्यानावाहनादी षोडशोपचारै: पूजां करिष्ये।’ असा संकल्प सोडावा. कलश, शंख, घंटा, दीप यांचे पूजन करून कलशातील पाणी तुळशीपत्राने पूजासाहित्यावर आजूबाजूस आपल्याअंगावर प्रोक्षण करावे (शिंपडावे).
*एक बीएसएफ तुकडी
*एक एसआरपीएफ तुकडी
*९ आरसीपीचे प्लॉटून
*१५ इगल पथक
*३ दंगा नियंत्रण पथक
*२१ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक
*७५ पोलिस प्रशिक्षणार्थी केंद्रातील कर्मचारी
*१४०० होमगार्ड
*१६ शस्त्रधारी पोलिस
२०५५ : जिल्ह्यातील गणेश मंडळे