आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन रात्री १२ पर्यंत; पोलिस, महापालिका प्रशासन, गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: भिलपुरा चौकी परिसरात विसर्जन मार्गाच्या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करताना महापालिकेचे कर्मचारी.
जळगाव - गणेशोत्सवात पोलिसांची सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक मंडळानी प्रबोधनात्मक विषयावरील देखावे सादरीकरणासह शांतता उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप द्यावा. तसेच विसर्जन हे रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करावे असा निर्णय गणेश विसर्जन मिरवणूक नियोजन बैठकीत झाला.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी मनपा, पोलिस प्रशासन गणेश मंडळांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी महापालिकेत झाली. व्यासपीठावर आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर उपस्थित होते. बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. यात शेवटच्या दिवशी म्हणजे ७२ प्रमुख मंडळांतर्फे गणेश विसर्जन होणार आहे. शिवतीर्थ मैदानापासून मिरवणुकांना सुरुवात होऊन मेहरूण तलावाजवळ समारोप होईल. शनिवारी मार्गावरील पाहणी केल्यानंतर शक्य झाल्यास मार्गात थोडासा बदल करण्यात येईल. तसेच विसर्जन हे रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण करावे असेही डॉ.सुपेकर यांनी सांगितले.

मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती
महापालिकेकडून विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील पांडे डेअरी, चेतनदास रुग्णालयापर्यंत खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील दोन दिवसांत मेहरूणपर्यंतचे काम पूर्ण होईल. टॉवर चौक ते सिंधी कॉलनी, इच्छादेवीपर्यंत बॅरिकेड‌्स लावण्याचे काम शनिवारी सुरू केले जाणार आहे. यासह निमखेडी पूल, गिरणा नदीसह अन्य कुठेही विसर्जन होणार नाही. ते मार्ग बंद केले जाणार आहेत. सकाळी ११ वाजता मपाच्या मानाचा गणपती निघून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. मनपाकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधेसाठी सर्व अधिकाऱ्यांचे नंबर महामंडळ पदाधिकाऱ्यांना देण्यात आले असून ते पूर्णवेळ कार्यरत असणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर पाडवी, गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, किशोर भोसले, अमित भाटिया, किशोर देशमुख, सागर वाणी, सचिन जाधव, राजेश जोशी, दीपक जोशी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक नवलनाथ तांबे यांनी सूत्रसंचालन केले. उपायुक्त प्रदीप जगताप यांनी आभार मानले.