आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेमल हातांनी साकारले गणराय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - यंदा गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळून आपल्याच हाताने कलाकुसरीतून घडवलेल्या मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करण्याचा संकल्प आर.आर. वदि्यालयातील १५० वदि्यार्थ्यांनी शुक्रवारी केला. एवढेच नव्हे, तर मुलांच्या या उपक्रमास प्रशिक्षक शलि्पकार, शिक्षक व संस्थाचालकांनी साथ देऊन त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी सुबक मूर्ती देखील तयार केल्या.

आर.आर.वदि्यालयात शुक्रवारी ‘पर्यावरणपूरक गणपती’ कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अवनिाश लाठी होते. या वेळी संचालक घनश्याम लाठी, दलिीप लाठी, समन्वयक प्रतिभा पाटील, श्रद्धा लाठी, मुख्याध्यापक डी.एस.सरोदे, प्राचार्य पंकज कुलकर्णी, अनलि चव्हाण, प्राचार्या सोनाली रेंभोटकर, रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.

न्यू इंिग्लश स्कूलचे कलाशिक्षक बन्सीलाल सुतार यांनी गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. संजय पलि्ले यांनी सूत्रसंचालन केले, तर अंजली शिंदे यांनी आभार मानले. तसेच अरुण सपकाळे, भीमराव तायडे, कीर्तीकुमार शेलकर, योगेश चौधरी, सचनि पाटील, लक्ष्मीनारायण पांडे, अनघा जोशी यांनी नियोजन केले.
...अन् बघता बघता तयार झाल्या आकर्षक मूर्ती
शाडू मातीला आकार देत त्यातून आकर्षक मूर्ती घडवण्याच्या प्रयत्नात मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मनाप्रमाणे मूर्ती घडवण्यात अनेकदा अपयश आल्यानंतरही उत्साह कमी न हाेऊ देता, जोमाने प्रयत्न करून मुलांनी अखेर मनाजाेगत्या मूर्ती तयार केल्या. बघता-बघता ५० पेक्षा अधिक मूर्ती वदि्यार्थ्यांनी साकारल्या. मुलांच्या या उत्साहाला खिरोदा येथील शलि्पकार अतुल मालखेडे यांनी रंग भरत प्रोत्साहन दिले. तसेच त्याच मातीतून एक भव्य अशी मूर्ती साकारत मूर्ती घडवतानाच्या स्टेप्सही त्यांनी प्रात्यक्षिकांतून दाखवल्या. शनविारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतही कार्यशाळा सुरू राहणार आहे.