आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागर पार्कवरील कृत्रिम कुंडामध्ये ३२१५ गणेश मूर्तींंचे विसर्जन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मनपाने प्रथमच कृत्रिम कुंड तयार करून त्यात मूर्ती विसर्जितसाठी अावाहन केले हाेते. या प्रयाेगास जळगावकरांनी भरघाेस प्रतिसाद दिला. तब्बल हजार ४२५ गणेशमूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन करण्यात आले.
‘दिव्य मराठी’नेही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भात पुढाकार घेऊन अभियान राबवे होते. त्यात सागर पार्क शिवतीर्थ मैदान अशा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी केलेल्या व्यवस्थेमुळे गणेशभक्तांना पर्यावरणपूरक गणेशाेत्सवाचीइच्छा पूर्ण करता अाली. दरम्यान, सामाजिक संस्थांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मेहरूण तलावात नेहमीच्या तुलनेत अत्यंत कमी निर्माल्य गेल्याने जलप्रदूषण राेखण्यासही मदत झाली. गेल्या १२ दिवसांपूर्वी वाजत-गाजत घराघरात मंगलमय वातावरण प्रतिष्ठापना केलेल्या गणपती बाप्पाला गुरुवारी वाजत-गाजतच निराेप देण्यात अाला. सकाळपासूनच गणेश मंडळांसाेबतच घरगुती गणेशमूर्तीही विसर्जित करण्याची लगबग सुरू हाेती. मेहरूण तलावावर सकाळपासूनच नागरिकांचा अाेढा वाढला हाेता. गणेश घाटमुळे जळगावकरांचे अाकर्षण मेहरूण तलावाकडे पाहायला मिळाले. पाच फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशाला सेंट टेरेसा शाळेच्या बाजूने क्रेनच्या सहाय्याने विसर्जित करण्यात अाले तर लहान घरगुती गणपती विसर्जनासाठी गणेश घाटावर दाेन तराफे एक बाेटची व्यवस्था केली हाेती.
या व्यतिरिक्त पर्यावरणाच्या दृष्टीने गणेश मूर्तींचे विसर्जन कुंडात करण्याबाबत ‘दिव्य मराठी’ने गेल्या काही दिवसांपासून जनजागृती सुरू केली हाेती. महापालिकेनेही त्यासाठी पाऊल उचलत सागर पार्क येथे ५० बाय २० अाकाराचा फूट खाेलीचा खड्डा केला हाेता. अतुलसिंह हाडा यांच्या अार्य चाणक्य बहुउद्देशीय संस्था, स्व. रामलालजी चाैबे ट्रस्ट, केशव स्मृती प्रतिष्ठान, कुतुहल फाैंडेशन, विजय वाणी यांच्या विद्या फाैंडेशनच्या साैजन्याने संपूर्ण व्यवस्था केली हाेती. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शहरातील हजार २१५ घरगुती गणेशमूर्तींचे सागर पार्क येथे तर २१० गणेशमूर्तींचे शिवतीर्थ मैदानावरील कुंडात विसर्जन करण्यात अाले. महापालिकेच्यावतीने दाेन्ही कृत्रिम कुंडात अमाेनियम कार्बाेनेट टाकण्यात अाले.

मान्यवरांच्या उपस्थितीत विसर्जन
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, महापाैर नितीन लढ्ढा, अायुक्त जीवन साेनवणे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास अधिकारी, अतुलसिंह हाडा अादी मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडू उमेश पाटील यांच्या घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यात अाले. सागर पार्क येथे दुपारनंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही उपस्थिती दिली. या उपक्रमाला जळगावकरांनी प्रतिसाद दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सामाजिक संस्थाही पुढे
महापालिकेने मूर्तिदानासाठीही अावाहन केले हाेते. यासाठी प्रवीण पाटील फाैंडेशन रजनी फाउंडेशनने बहिणाबाई उद्यान ब्रुकबांॅड काॅलनी येथे स्टाॅल लावले हाेते. या दाेन्ही ठिकाणी परिसरातील नागरिकांनी सुमारे २६० गणेशमूर्ती सुपूर्त केल्या. प्रवीण पाटील, मयूर पाटील, सरिता बाेरसे, अक्षय साेनवणे कार्यकर्त्यांनी सर्व गणेशमूर्तीं वाहनाने मेहरूण तलावात विधीवत पूजा करून विसर्जीत केल्या.

भक्तांनीच काढून दिले निर्माल्य
राेटरॅक्ट, राष्ट्रवादी महिला अाघाडी, निर्मिती फाउंडेशन, एल. के. फाउंडेशन, निरकारी मंडळाचे स्वयंसेवक, अार्य चाणक्य संस्थेचे पदाधिकारी विसर्जन स्थळाच्या परिसरात दिवसभर उभे हाेते. येणाऱ्या भाविकांना हात जाेडून निर्माल्य काढण्याची विनंती करत हाेते. काही भक्त स्वत: निर्माल्य टाकण्यासाठी स्वयंसेवकांचा शाेध घेत हाेते. दिवसभरात ट्रॅक्टरच्या १६ ट्रीप असे तब्बल ३६ टन निर्माल्य गाेळा झाले.
बातम्या आणखी आहेत...