आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषण, अस्वच्छतेविराेधात जळगावकरांची वज्रमूठ; विसर्जन मिरवणुकीत 157 टन निर्माल्य संकलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कचरा, अस्वच्छता आणि जलप्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीत जळगावकर नागरिकांनी निर्माल्य संकलनाच्या मोहिमेस भरभरून प्रतिसाद देत दिवसभरात १५७ टन निर्माल्य संकलन केले. १८ निर्माल्य रथ,३२ स्टॉल्स आणि विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या सुमारे अडीच हजार नागरिक, स्वयंसेवकांनी या मोहिमेत हिरहिरीने सहभागी होत जलप्रदूषणाविरोधात वज्रमूठ केली आणि त्यांच्या या मोहिमेमध्ये प्रत्येक जळगावकर नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाला. लाडक्या श्री गणेशाला निरोप देण्यापूर्वी नागरिकांनीच स्वत:हून मूर्तीवरील हार,फुले, निर्माल्य बाजूला काढून ठेवले. 
 
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर दरवर्षी मेहरूण तलावातील गणेश घाट परिसर तसेच शहरातही जागोजागी हार, फुले, प्लास्टिक पिशव्या, मिठाईचे डबे,फळे,नारळ आदी इतरत्र विखुरलेले दिसतात. दुसऱ्या दिवशी या कचऱ्यामुळे शहरात अनेक भागात दुर्गंधीही सुटते. हे चित्र पालटले. मंगळवारच्या विसर्जनानंतर बुधवारी सकाळी गणेश घाट परिसर स्वच्छ दिसत होता. मेहरूण तलाव परिसरातही निर्माल्य दिसत नव्हते.शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला की हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या जळगावकरांचे अाणखी एक सकारात्मक रूप गणेश विसर्जनाच्या निमित्ताने पाहायला मिळाले. प्रशासनाच्या अावाहनाला प्रतिसाद देत जलप्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून गणरायाच्या अंगावरील निर्माल्य बाजूला काढत स्वच्छ सुंदर शहरासाठी माेठा हातभार लावला. शहर निर्माल्य संकलन माेहीम २०१७ अंतर्गत शहरातील विविध भागातून निर्माल्याचे संकलन करण्यात अाले. त्यामुळे गणेशाेत्सव अस्वच्छतेपासून मुक्त करीत स्वच्छतामय करण्यात अाला. 
 
बातम्या आणखी आहेत...