आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘श्री’ विसर्जन मिरवणुकीवर ड्राेन कॅमेऱ्याची नजर; फिरता बंदाेबस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बाप्पाला मंगळवारी निराेप देण्यात येणार अाहे. त्या दृष्टीने प्रशासन सज्ज झालेे अाहे. साेमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मिरवणूक शांततेत पार पाडून सार्वजनिक मंडळाने रात्री १० वाजेच्या अात तर खासगी मंडळांनी सूर्यास्ताच्या अात विसर्जन करण्याचे अावाहन केले. तसेच पाेलिस प्रशासनाने देखील दिवसभर बंदाेबस्ताची तयारी केली. पाेलिसांची मिरवणुकीवर करडी नजर राहणार असून फिरता बंदाेबस्त लावला जाणार अाहे. संवेदनशील भागांवर ड्राेन कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात येणार आहे. 
 
शिवाजी पुतळा ते भिलपुरा चौकादरम्यान विसर्जन मिरवणुकीचा सर्वाधिक जल्लोष उत्साह असतो. याठिकाणी माेठा बंदोबस्त लावण्यात येणार अाहे. आवश्यकता नसलेल्या ठिकाणावरून अतिरिक्त बंदोबस्त वेळोवेळी हलवण्यात येणार आहे. या फिरत्या बंदोबस्तामुळे गरज असलेल्या ठिकाणी जास्तीची पोलिस कुमक वापरली जाणार आहे. जळगावात पहिल्यांदाच फिरत्या बंदोबस्ताचा प्रयोग केला जाणार आहे. 
 
सामान्य रुग्णालयाचे पथक 
मेहरूण तलाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाची एक रुग्णवाहिका, एक डॉक्टर मदतनीस असे पथक तैनात करण्यात आले आहे. 
 
या असणार सुविधा 
- मिरवणुकीचे थेट प्रसारण 
- १० ट्रॅक्टरद्वारे निर्माल्य संकलन 
- शहरात ठिकाणी मोबाइल टॉयलेट 
- २२ ठिकाणी कचरा पेट्या 
- वजनदार मूर्तींसाठी क्रेन 
- निर्माल्य कचऱ्याची योग्य विल्हेवाट 
 
चित्तथरारक प्रात्यक्षिके 
महाराणा प्रताप मंडळातर्फे काेल्हापुरातील प्रसिद्ध सूरज ढाेली यांचे मर्दानी खेळ पथक मिरवणुकीत शिवकालीन युध्द कलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके प्रमुख दहा चाैकांमध्ये दाखवले जाणार अाहे. यासाठी ५०० लिंबू, १०० नारळ, केळी, १० लिटर राॅकेलची व्यवस्था केल्याचे नगरसेवक कैलास साेनवणे यांनी सांगितले. 
 
शेवटच्या दिवशी भक्तांची तोबा गर्दी 
गणरायाच्यास्थापनेपासूनच गणेशभक्तांच्या उत्साहाला आलेले उधाण मंगळवारी संपणार आहे. या उत्सवात सोमवारी विसर्जनाच्या पूर्वसंध्येस भक्तांची मांदियाळी अधिकच जमली होती. शेवटचा दिवस असल्याने भाविकांचा उत्साह अपार होता. रात्री उशिरापर्यंत आरास बघण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. गेल्या ११ दिवसांपासून गणेशोत्सवाचा आनंद लुटला जात आहे. सुरुवातीच्या तीन दिवस झालेल्या पावसामुळे आरास बघण्यासाठी आठ दिवसांचा अवधी भाविकांना मिळाला होता. शनिवार रविवारनंतर सोमवारी भाविकांचा उत्साह अधिकच होता. शेवटचा दिवस असल्याने सायंकाळी वाजेपासूनच गर्दी झाली होती. 
 
असा आहे बंदोबस्त 
पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, २८ सहायक पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक, एसआरपीएफ प्लाटून, क्युआरटी पथक, प्रत्येकी ईआरटी आरसीपी पथक, ७०० पोलिस कर्मचारी ४०० गृहरक्षक दलाचे जवान 
बातम्या आणखी आहेत...