आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती विसर्जन मिरवणूक निर्विघ्न; शहरात गुलालाची मनसाेक्त उधळण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहर अाणि बाजारपेठ हद्दीतील ४० सार्वजनिक गणेश मंडळांनी गुरुवारी विसर्जन मिरवणुकीत सहभाग नाेंदवला. पाेलिसांनी गुलालाएेवजी फुलांची उधळण करण्याचे सूचित केले हाेते. मात्र, बहुतांश मंडळांनी या सूचना गांभीर्याने घेतल्या नाहीत. सुमारे १० तास चाललेली ही विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडली.
शहरात यंदा १७९ सार्वजनिक गणेश मंडळांनी पाेलिसांकडून परवानगी घेऊन गणरायाची स्थापना केली हाेती. सार्वजनिक मिरवणुकीत ४० मंडळांनी सहभाग नाेंदवला. नृसिंह मंदिराजवळून गुरुवारी दुपारी वाजता नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, उपाध्यक्ष युवराज लाेणारी, अाराेग्य समिती सभापती भीमराज काेळी यांच्या उपस्थितीत स्टुडंट गणेश मंडळाच्या वाहनासमाेर श्रीफळ अाेवाळून मिरवणुकीला प्रारंभ झाला. अामदार संजय सावकारे यांनीही गणरायांची पूजा करून ‘शहरात सुख, शांती नादू दे’ असे नगराध्यक्ष, उपाध्यक्षांनीही ढाेल-ताशांच्या तालावर ठेका धरला हाेता.

बाजाराला छावणीचे स्वरूप : विसर्जनमिरवणूक मार्गावर सराफ बाजारात मशिदीसमाेरील चाैकाला पाेलिस छावणीचे स्वरूप अाले हाेते. डीवायएसपी राेहिदास पवार यांच्या मार्गदर्शनात राज्य राखीव दलाचे जवान, बाजारपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सराेदे, शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत माेरे यांच्यासह पाेलिस पथकाने चाेख बंदाेबस्त ठेवला. गुलालाची उधळण करून मिरवणूक रेंगाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना पाेलिसांचा प्रसाद खावा लागला. सायंकाळी ते वाजेच्या सुमारास वरूण राजानेही हजेरी लावल्याने गणेशभक्त चिंब भिजले. मिरवणूक मार्गावरील वीजतारा, केबलची उंची वाढवल्याने यंंदा २० ते २२ फूट उंचीच्या मूर्ती असूनही गणेश मंडळांना अडचणी अाल्या नाहीत. शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने गणेशभक्तांसह मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूक्ष्म नियाेजनाचे काैतुक केले.

हुल्लडबाज पाेलिसांच्या रडारवर; पाेलिस ठाण्यात बाेलवून समज देणार
^गणेशाेत्सव विसर्जन मिरवणुकीत वाहनांच्या सायलन्सरसमाेर उभे राहून गुलालाची उधळण करून हुल्लडबाजी करणाऱ्या मंडळांची नावे लिहिली अाहेत. संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बाेलवून त्यांना याेग्य समज दिली जाईल. गरज भासली तर गुन्हेही दाखल करण्यात येतील. भविष्यात गाेंधळ घालणाऱ्यांना परवानगी देताना पाेलिस प्रशासनातर्फे विचार करू. - राेहिदासपवार, डीवायएसपी, भुसावळ


सूक्ष्म नियाेजन
गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीची काेंडी हाेऊ नये म्हणून पाेलिस दलाने यंदा सूक्ष्म नियाेजन केले. यावल नाक्याच्या शेजारून तापी नदीवरील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक काेंडी हाेऊ नये म्हणून यंदा बॅरिकेड्स लावण्यात अाले हाेते. तापी नदीच्या पात्रातील लहान पूल, स्मशानभूमी, इंजीन घाट या मार्गावरही बॅरिकेड्स लावल्याने गैरसाेय टळली. २० ते २२ फूट उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन हतनूर वाघूर धरणात करण्यात अाले. सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत तापी नदीच्या दुतर्फा गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी केली हाेती. सामाजिक संस्थांनी निर्माल्य संकलनासाठी ट्रॅक्टर ट्राॅली उभ्या करण्यात अाल्या हाेत्या. जिल्हा अापत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ हे अापल्या सहकाऱ्यांसह नदी पात्राजवळ तळ ठाेकून हाेते.
बातम्या आणखी आहेत...