आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganpat Choudhari Guidance To People News In Marathi

विद्यार्थ्यांचे माेफत प्रबाेधन करणारे ‘चाचा चाैधरी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विद्यार्थ्यांना दरराेज अभ्यास करण्यासह विविध अडचणींना ताेंड द्यावे लागते. या अडचणींवर मात कशी करावी यासह तणावरहित जीवन कसे जगावे? यासाठी ६८वर्षीय गणपतदास द्वारकादास चौधरी ऊर्फ चाचा चाैधरी धडपडत अाहेत. ते थेट शाळांमध्ये जाऊनविद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना माेफत मार्गदर्शन करीत असून, त्यांचा हा अनाेखा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत अाहे.
गणपतदास द्वारकादास चौधरी (रा.बऱ्हाणपूर) हे केटरिंग हॉटेल व्यवसाय करीत होते. मात्र, सन २००६पासून त्यांनी व्यवसाय बंद करून मानवसेवा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना मदत करण्याचा विडा उचलला अाहे. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असल्यामुळे त्यांच्यासाठीच काम करण्याचे चौधरी यांनी ठरवले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी एक विशेष सूची तयार केली आहे. त्यानुसार डिसेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत ज्या शाळेने त्यांना बोलावले तेथे ते जाऊन ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
महिन्याला १००पेक्षा जास्त व्याख्याने देण्याचा त्यांचा विक्रम आहे. १४ डिसेंबर रोजी महाबळ परिसरातील हेमंत क्लासेसमध्ये सकाळी ८.३० वाजता चौधरी यांचे व्याख्यान हाेणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१४ या दरम्यान त्यांनी ५८ व्याख्याने दिली आहेत.