आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांवर गणेशभक्तांची सुनामी: गणपतीच्या पावलाने बाजारात लक्ष्मी आली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गणेशोत्सवसंपण्यास अवघे दोनच दिवस शिल्लक असल्याने शुक्रवारी रात्री बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे गणेश भक्तांची सुनामीसारखी लाट उसळल्याचे चित्र पहायला मिळाले. नेहरू चौकापासून टॉवर चॉक, तर जयप्रकाश नारायण चौक ते बँक स्ट्रीटपर्यंत सगळीकडे लहान मुले, महिला, तरुण-तरुणी पुरुषांच्या झुंडी पाहायला मिळाल्या. या वेळी प्रत्येकाची धडपड रांगेत आपला नंबर लवकर लागण्यासाठीच होती. यंदा बाबा बर्फानीची क्रेझ वाढल्याने दर्शनासाठी भाविकांनी थेट नाथ प्लाझापर्यंत रांग लावलेली होती. तसेच गणरायाचे मनमोहक रूप आपल्या मोबाइलमध्ये टिपणाऱ्यांचीही संख्या मोठी होती. हातावर पोट भरणाऱ्यांसाठी गणरायामुळे दुष्काळाचे हे दिवस ‘अच्छे दिन’ ठरले, यात शंकाच नाही.
बकरी ईदची सुटी त्यातच बाप्पाच्या जाण्याचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्याने गणेशोत्सवाचा नववा दिवस प्रचंड उत्साहाचा ठरला. आतापर्यंत आरास पाहण्यासाठी घराबाहेर पडलेले नागरिक परिवारासह शुक्रवारी रस्त्यांवर उतरले होते. अनेकांची सुरुवात नेहरू चौक, तर काहींची सुरुवात टॉवर चौकापासून झाली. नेहरू चौकापासून वाहनांना बंदी असल्याने गोविंदा रिक्षा स्टॉप खान्देश सेंट्रलच्या रस्त्यावर जिकडे-तिकडे वाहनांची गर्दी होती.

रेल्वे स्टेशन रोडवरील जय गणेश मंडळाच्या बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी तर प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली. त्यासाठी आबालवृद्धांनी चक्क नाथ प्लाझापर्यंत रांगेत उभे राहणे पसंत केले. काहींनी रांग मोठी म्हणून नेहरू चौक मित्र मंडळाकडे मोर्चा वळवला; परंतु त्या ठिकाणीही गोलाणी मार्केटच्या रस्त्यावर रांगा होत्या. शिवा गणेश मंडळाची आरास पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती. शास्त्रीय टॉवर चौकाकडे चालत गेले असता, जिल्हा बँकेच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेत अनेकांनी जळगाव जनता कर्मचारी बँकेच्या काहींनी नवीपेठ गणेश मंडळाकडे जाणे पसंत केले.
लाडक्या बाप्पाची मोबाइलमध्ये छबी
नेहरूचौक मंडळाच्या मनमोहक मूर्तीचे छायाचित्र मोबाइलमध्ये टिपण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. श्रीगर्जना मित्र मंडळाची आरास त्याच समोर असलेल्या पंचरत्न गणेश मंडळाच्या गणरायाचे दर्शन खुद्द पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी रात्री ८.४५ वाजता घेतले. या वेळी त्यांच्या सोबतचा फौजफाटा गर्दीचे लक्ष वेधून घेत होता. जय गोविंदा मित्र मंडळासमोरही प्रचंड गर्दी होती. एम.जी.रोडवरील गणेश मंडळाने उभारलेल्या बाबा अमरनाथ माता वैष्णोदेवीची भव्य आरास पाहणाऱ्यांनी संपूर्ण रस्ता व्यापला होता. जय किसनवाडी, तायडे गल्ली आदी ठिकाणच्या गणरायांचे दर्शन घेतल्यानंतर गणेशभक्त सुभाष चौकाकडे जात होते. तसेच तिकडून येणाऱ्यांचे प्रमाणही प्रचंड होते. अनेक भाविकांनी रस्त्यावरच वाहने लावल्यामुळे समस्या निर्माण झाली.
दुष्काळाचीझळ सोसणाऱ्यांना फायदा
गणेशोत्सवम्हणजे प्रत्येक घरात उत्साहाचे आनंदाचे वातावरण. महिनाअखेर असला तरी अाधीच करून ठेवलेल्या तरतुदीमुळे लहान मुलांसह घराबाहेर पडलेल्या नागरिकांसाठी खिसा रिकामा होणार हे नक्की होते. शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने बँक स्ट्रीट नेहरू चोक ते टॉवर चौकादरम्यान किरकोळ विक्रेत्यांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला दुकाने थाटली होती. त्यांच्याकडे खाद्यपदार्थांपासून केसांच्या चिमट्यापर्यंत सर्व काही उपलब्ध होते. प्रचंड गर्दीमुळे यात्रेचे स्वरूप आले असल्याने दुष्काळाची झळ सहन करणाऱ्या विक्रेत्यांसाठी गणेशोत्सव भरभराट आणणारा ठरला.

गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी अनबाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने त्यातल्या त्यात बकरी ईदची सुटी आल्याने शुक्रवारी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. नेहरू चौकापासून ते थेट टॉवर चौकापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
गणपतीच्या पावलाने बाजारात लक्ष्मी आली
जळगाव- जानेवारीपासून आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडलेल्या बाजारपेठेत बाप्पाच्या आगमनाने मंदीची कोडी फुटली आहे. व्यापार, उद्योगातील मंदीचे सावट दूर होऊन चैतन्य परतले आहे. गणेशोत्सवात पहिल्याच दिवशी झालेल्या पावसाने ग्राहकवर्ग सुखावला असल्याचे पाहून विविध कंपन्या, व्यापाऱ्यांनीदेखील ऑफर्सचा पाऊस पाडल्याने मार्केटमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढलेली आहे. श्रीगणेशा उत्तम झाल्याने येत्या सहा महिन्यांत मार्केट पुन्हा गती पकडेल, असा विश्वास व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

जगभरात बाऊ केला जात असलेल्या मंदीचे सावट आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून मार्केटमध्ये स्थानिक ग्राहकांचा फारसा प्रतिसाद नाही. जानेवारी महिन्यापासून मंदीचे ढग अधिक गडद झाले होते. ७-८ महिने मंदीची झळ सोसणाऱ्या मार्केटचे गणेशोत्सवानिमित्ताने विघ्न टळले आहे. सुरुवात चांगली झाल्याने येत्या डिसेंबरपर्यंतची परिस्थिती बाजारपेठेतील स्थिती बदलण्यास कारणीभूत ठरेल. इलेक्ट्रॉनिक्स, ऑटॉमोबाइल आणि रिअल इस्टेटमध्ये व्यापारी, गुंतवणूकदार, कंपन्यादेखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना, ऑफर्सची बरसात करत आहेत. त्याला ग्राहकांकडूनदेखील वाढता प्रतिसाद मिळत आहे.

खाद्यपदार्थांच्या व्यवसायात वाढ
गणेशोत्सवानिमित्तबहुतांश जळगावकर सायंकाळी कुटुंबासह शहरात फिरायला बाहेर पडत आहेत. सायंकाळी ते रात्री ११ वाजेपर्यंत गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती, आरास बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. परिणामी, रस्त्यावरील खाद्यपदार्थ, आइस्क्रीम विक्रेते तसेच हॉटेलच्या व्यवसायात वाढ झाली आहे. लागून आलेल्या सुट्या आणि रविवारी गणेश विसर्जन असल्याने शेवटचे दोन दिवस मार्केटमध्ये चैतन्य पसरले आहे. दरम्यान, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा व्यवसाय इतर वेळेपेक्षा दुप्पट ते चारपट वाढल्याचे चित्र आहे.

आफटोमोबाइल बाजारपेठेत ऑफर्स
शेती आणि पाऊस यावर बहुतांश प्रतिसाद अपेक्षित असलेल्या ऑमोबाइल क्षेत्रात सर्वाधिक मंदीची झळ बसली आहे. गेल्या दिवाळीपासून मंदीशी झुंजत असलेल्या ऑटोमोबाइल क्षेत्राला गणेशोत्सवात प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात दसरा आणि दिवाळीपर्यंत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सर्वच कंपन्या, विक्रेत्यांनी ग्राहकांना ऑफर्स देऊ केल्या आहेत. यात विमा, रोख सूट, भेटवस्तू सारख्या ऑफर्स सध्या विक्रेते ग्राहकांना देत आहेत.

रिअलइस्टेटमध्ये ऑफर्सवर सवलत
गेल्यातीन वर्षांपासून प्रतिसाद कमी झालेल्या रिअल इस्टेट, प्रॉपर्टी व्यवसायात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डरांनी विविध स्किम आणल्या आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी हे मुहूर्त साधण्यासाठी अनेक ऑफर्स पुढे आल्या आहेत. बंगलो, फ्लॅट, रो-हाउसमध्ये जास्तीच्या सुविधांत सीसीटीव्ही कॅमेरे, इन्शुरन्स, लोन, लिफ्ट, गार्डन यासारख्या सुविधा देत आहेत. काहींनी मुहूर्तावर घर घेणाऱ्यांना रोख सूट देण्याचीदेखील योजना आणली आहे. मुहूर्तावर अल्प रक्कम देऊन ताबा घेण्याच्या काहींच्या योजना आहेत. तसेच ग्राहकांच्या हितासाठी विविध सुविधा देण्याचेही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दरम्यान, बिल्डर्सने दिलेल्या ऑफर्सला ग्राहकांकडून विचारणा होत असून येत्या दोन महिन्यांत रिअल इस्टेटमध्ये चांगले चित्र बघायला मिळेल, असा विश्वास काही बिल्डरांनी व्यक्त केला आहे.

नवे मॉडेल, ऑफर्सला प्रतिसाद
जिल्ह्यातील ऑटोमोबाइल क्षेत्रात शेतकरीवर्ग हाच प्रमुख ग्राहक आहे. नोकरदारवर्गाकडून मिळणारा प्रतिसाद अल्प आहे. दुष्काळी स्थिती, पाऊस नसल्याने दोन वर्षांपासून मंदीचे चित्र आहे. या वर्षी गणेशोत्सवानिमित्त चांगली सुरुवात झाली आहे. नवीन मॉडेलला ग्राहकांचा प्रतिसाद आहे. काही मॉडेलवर २० हजारांपासून ते ६० हजारांपर्यंत रोख सूट देण्यात येत आहे. सुरुवात चांगली झाल्याने येणाऱ्या दसरा, दिवाळीच्या मुहूर्ताला आणखी प्रतिसाद वाढण्याची अपेक्षा आहे. कैलासपाटील, ऑटो मोबाईल तज्ज्ञ

ग्राहकांची संख्या वाढली
इलेक्ट्रॉनिक्समार्केटचे अर्थकारणदेखील शेतीकेंद्रित असल्याने मार्केटवर त्याचा परिणाम झाला आहे. पावसावर सर्व अवलंबून असल्याने मार्केटवर तत्काळ परिणाम होतो. गेल्या चार महिन्यांचा विचार केला तर गणेशोत्सवात थोडासा प्रतिसाद वाढला आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाने ग्राहकांची संख्या वाढली हाेती. फोरजी एलईडी टीव्ही, एसीला मागणी आहे.