आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरणगाव मार्गावरील वाहतूक करणार बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.१५) सकाळपासून वरणगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जाणार असून, बसस्थानक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर स्थलांतरीत केले जाणार आहे. मिरवणुकीच्या मार्गाला जोडणाऱ्या उपरस्त्यांना १३ ठिकाणी बॅरिकेड‌्स लावले जातील. यासोबतच नाहाटा चाैफुलीपासून शहरात येणारा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद केला जाणार आहे.
शहर बजारपेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण १८० गणेश मंडळांनी स्थापना केली अाहे. गुरूवारी अनंत चतुर्दशीनिमित्त शहरातून विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे. त्यामुळे पाेलिस प्रशासनाने नियोजनाला गती दिली आहे. डीवायएसपी राेहिदास पवार, बाजारपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सराेदे गाेपनीय शाखेचे हवालदार छाेटू वैद्य, बाळू पाटील, नंदकिशाेर साेनवणे यांनी विसर्जन मिरवणुकीबाबत गुरुवारी चर्चा केली. त्यानुसार शहरातील काही रस्त्यांवर १० ठिकाणी लाकडांचे बॅरिकेड‌्स लावण्याचा ठेका देण्यात अाला अाहे.
नियोजनअसे : गुरुवारीसकाळपासून वरणगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जाईल. फक्त पादचारी या मार्गाचा वापर करू शकतील. मुक्ताईनगर, वरणगावकडून येणाऱ्या बसेस नाहाटा चाैफुलीवरून पुढे काेणार्क हाॅस्पिटलजवळील वाय पाॅइंटवरून डीएस हायस्कूलच्या मैदानावर येतील. नाहाटा चाैफुलीवरून अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी असेल.

^विसर्जन मिरवणुकीसाठीएसअारपी अारसीपी प्लॅाटूनच्या बंदाेबस्ताची मागणी केली अाहे. काही रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने बंद केले जातील. त्यासाठी बॅरिकेड‌्स लावण्याचा ठेका दिला अाहे. राेहिदासपवार, डीवायएसपी

^विसर्जनाच्या दिवशीबसस्थानकाचे स्थलांतर केले जाणार अाहे. याबाबत पोलिसांचे पत्र मिळाले आहे. या बदलाची प्रवाशांनी नाेंद घ्यावी. गांधी पुतळ्याकडूनच सर्व बसेस धावणार आहेत. के.व्ही.महाजन, अागारप्रमुख, भुसावळ

विसर्जन मिरवणुकीसाठी हे रस्ते होणार बंद
शहरात१३ ठिकाणी बॅरिकेड‌्सने रस्ते बंद केले जातील. मिरवणुकीच्या मार्गाला जाेडणाऱ्या लहान रस्त्यांचा यात समावेश असेल. शनिमंदिर वॉर्डातील दाेन मार्ग, नृसिंह मंदिर, जवाहर डेअरी, डिस्काे टाॅवर, अप्सरा चाैक, मशिदीजवळील राम मंदिर बाजूचा रस्ता, मरिमाता मंदिराच्या पुढील रस्ता, भजे गल्ली, खालम्मा बाेळ, गांधी चाैकीजवळील रस्ता, शालिमार हाॅटेलच्या बाजूचा समाेरील रस्ता, अमरदीप टाॅकीजकडील रस्ता, मच्छी मार्केटकडे जाणारा मार्ग बॅरिकेड‌्स लावले जाईल.
बातम्या आणखी आहेत...