आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता अभियानातून २५ ट्रॅक्टर कचरा गाेळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हा सामान्य रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे १६ दिवसांपासून रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत हाेते. यात १८ ट्रॅक्टर कचऱ्यासह ट्रॅक्टर बायाेवेस्ट गाेळा करून परिसर स्वच्छ करण्यात अाला.

जिल्हा सामान्य रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे रुग्णालय परिसरातील गवत, केर-कचरा यासह संपूर्ण भागाची स्वच्छता करून १८ ट्रॅक्टर कचरा तर ट्रॅक्टर बायोवेस्ट मटेरिअल जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यासाठी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांनी पुढाकार घेऊन पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने माेहीम यशस्वी केली. मोहिमेत महेंद्र बागुल, कैलास पाटील, डॉ. मिलिंद बारी, दीपक पाटील, मनोहर पाटील, प्रवीण पाटील, सुभाष सोनवणे, कल्पना ठाकूर, सुरेखा लष्करे, डी. एच. भास्कर, मोहन साळुंके, ज्ञानदेव पाटील, सुभाष भोळे, अनिल सपकाळे, मंगेश बोरसे, बापू बागलाने, प्रभाकर पाटील यांनी सहभाग घेतला.
जिल्हा सामान्य रुग्णालयात सफाई करताना कर्मचारी संस्थेचे सदस्य.
बातम्या आणखी आहेत...