आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनधन योजनेत गॅस एजन्सींचाही सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जनधन योजनेंतर्गत खाते उघडण्याच्या मोहिमेत गॅस एजन्सीधारकांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे.

गॅस सिलिंडवरील अनुदान बँक खात्यात जमा करण्याची योजना पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, याविषयी गॅस एजन्सीधारकांना कुठल्याच सूचना प्राप्त नाहीत. तरीही गॅस एजन्सीधारकांना जनधन योजनेत सहभागी करून घेण्यात आले आहे. एजन्सीधारकांनी त्यांच्या खातेदारांना जनधन योजनेत बँक खाते उघडावे, असे आवाहन करावे, अशा सूचना वरिष्ठस्तरावरून आल्या आहेत.
हे खाते सिलिंडरचे अनुदान जमा करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. परंतु याविषयी बँका आणि संबंधित यंत्रणेला पुढील कुठलीच दिशा नसल्याने सध्या फक्त मोहीम राबवण्यावर भर दिला जात आहे. गॅस एजन्सीधारकांनाही यात सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे या यंत्रणेचा वापर नेमका कुठे गेला जाणार आहे. जनधन योजनेच्या पुढील मार्गदर्शक सूचना अद्याप कुणालाही नसल्याने याविषयी चित्र स्पष्ट नाही.

वरिष्ठांकडून पत्र
शहरातील रेखा गॅस एजन्सीचे संचालक दिलीप चौबे यांना गॅस वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जनधन योजनेसाठी ग्राहकांना खाते उघडण्यासाठी आवाहन करा, असे पत्र दिले आहे. त्यानुसार गॅस एजन्सीकडून कार्यवाहीदेखील सुरू आहे.