जळगाव- ज्याग्राहकांकडे एकच सिलिंडर आहे, त्यांची ऐन सणासुदीत सिलिंडर संपल्यास चांगलीच तारांबळ उडते. त्यांना तत्काळ सिलिंडर हवे असते. मात्र, सिलिंडर उपलब्ध नसल्यास त्यांची मोठी अडचण होत असते. त्यामुळे अशा ग्राहकांची अडचण दूर करण्यासाठी त्यांना 2100 रुपयांत दुसरे सिलिंडर देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी एजन्सींना दिले आहेत.
शहरातील भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन पेट्रोलियम या कंपन्यांकडून गॅस सिलिंडर पुरवण्यात येतात. तिन्ही कंपन्यांच्या मिळून 10 एजन्सीज शहरात आहेत. एक सिलिंडर असलेल्या ग्राहकाचे सिलिंडर संपल्यास त्यांना तत्काळ सिलिंडर हवे असते. परिणामी, दोन सिलिंडर असलेल्या ग्राहकांची प्रतीक्षा यादी वाढत जाते. अनेकदा ग्राहकांना सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने अडचण होत असते. सणासुदीत ही अडचण अधिकच वाढते. त्यासाठी गॅस कंपन्यांनी आता सर्वच ग्राहकांनी दोन सिलिंडर घ्यावेत म्हणून विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. एजन्सीकडूनही ग्राहकांना तसे सूचवण्यात येत आहे.
ग्राहकांचाच फायदा दुसरेसिलिंडर घेतल्याने ग्राहकांची होणारी तारांबळ थांबेल. दुसरे सिलिंडर घरात भरलेले असल्याने जेव्हा सिलिंडर संपेल तेव्हा तत्काळ घरात असलेले सिलिंडर लावता येते. ही योजना ग्राहकांच्याच फायद्याची आहे, मात्र अधिक रकमेमुळे ग्राहक या पर्यायाला पसंती देत नाहीत.