आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ: शहरातील रेशनकार्डधारकांकडे प्रत्यक्षात किती गॅस सिलिंडर आहेत, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार गृहभेटीतून माहिती संकलित केली जाणार आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. तालुक्यातील गॅस सिलिंडरची माहिती यानिमित्ताने समोर येईल.
तहसीलदार प्रतापसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुक्यातील मोहीम सुरू झाली आहे. त्यात प्रत्येक गावातील तलाठी आणि त्यांचे सहकार्यांची नियुक्ती झाली आहे. केंद्र शासनाकडून राज्याला सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत नियमानुसार रेशनकार्डधारकांना वितरणासाठी रॉकेल कोटा मिळतो. राज्यातील वाढते गॅस कनेक्शन आणि सीएनजीची संख्या लक्षात घेऊन केंद्राने राज्याच्या रॉकेल कोट्यात जून 2011 आणि एप्रिल 2012 मध्ये 23 व 24 टक्के कपात केली आहे. रेशनकार्डधारकांना मिळणारे रॉकेल हे केवळ स्वयंपाक व दिवाबत्तीसाठी वापरावे, अशा सरकारच्या सूचना आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गंत रॉकेलचा गैरवापर न होता ते पात्र रेशनकार्डधारकांना मिळावे, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.
रॉकेल मिळण्यास पात्र असलेल्या सर्व कार्डधारकांची तपासणी प्रत्यक्ष गृहभेटीतून होईल. तसेच कार्यक्षेत्रात वितरीत झालेल्या सिंगल व डबल एलपीजी गॅस आणि सीएनजी गॅस कनेक्शनबाबत ऑइल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रॉकेलचा कोटा ठरविण्यात येईल. तहसीलदार, तलाठी, मंडळाधिकार्यांसह पंचायत समिती कर्मचार्यांची मदत घेण्यात आली आहे.
मोहीम सुरू झाली
तालुक्यातील कार्डधारकांकडे किती गॅस सिलिंडर आहेत, याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. यासाठी महसूल आणि पंचायत समितीचे कर्मचारी कामाला लागले आहे. या मोहिमेची माहिती जिल्हाधिकार्यांना एक सप्टेंबरपर्यंत दिली जाणार आहे. प्रतापसिंग राजपूत, तहसीलदार
तर रॉकेल मिळणार नाही
शहरासह तालुक्यातील ज्या रेशनकार्डधारकांकडे दोन गॅस कनेक्शन असतील, त्यांना रॉके ल मिळणार नाही, असा शासनाचा आदेश आहे. मात्र, अन्य कार्डधारकांना त्या-त्या कार्यक्षेत्राला लागू असलेल्या नियमानुसार रॉकेल वितरण होणार आहे. ज्या नागरिकांकडे अद्यापही गॅस कनेक्शन नसले अशा रेशनकार्डधारकाच्या घरातील व्यक्तींची संख्या स्वतंत्रपणे नोंदवण्यात येईल. 31 ऑगस्टपर्यंत ही मोहीम पूर्ण करायची असून पाच सप्टेंबरपर्यंत शासनाला अहवाल सादर करायचा आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.