आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ देऊन ‘आधार’ लिंकिंग करण्यास गॅस ग्राहक उदासीनच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गॅस सबसिडी थेट बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही शहरासह तालुक्यातील गॅस ग्राहकांची सबसिडीसाठी आधारकार्ड लिकिंग करण्यास ग्राहकच उदासीन दिसून येत आहेत. यामुळे केंद्र शासनाच्या योजनेचे उद्दिष्ट साध्य होण्यात अडचणी येत आहेत. अद्याप ग्राहकांच्या तुलनेत निम्मेच काम झाले असल्याने आणखी दीड महिन्याची मुदत ग्राहकांना देण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना आपले आधार कार्ड लिंकिंग करावे लागणार आहे.

ग्राहक करताहेत कानाडोळा
अनेकदा आवाहन करूनही गॅसधारक याकडे कानाडोळा केला आहे. मुदतवाढ देऊनही ग्राहक लिंकिंग करतील का ? हा खरा प्रश्न आहे. अद्याप बीपीसीएलचे 54 टक्केच काम झाले आहे. - दिलीप चौबे, गॅस एजन्सीचालक

जे ग्राहक जागृत आहेत, त्यांनी सुरुवातीलाच आवाहन केल्याप्रमाणे बँक खाते लिंक केले. परंतु आजही अनेक ग्राहकांनी कार्ड लिंकिंग केले नसल्याने अनेक अडचणी येत आहे. राजेंद्र भारंबे , गॅस ग्राहक