आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुण्यापेक्षा जळगावात घरगुती गॅस सिलिंडर महाग!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गॅस कंपन्यांनी नव्या वर्षात पहिल्याच तारखेला गॅसच्या किमती अचानक वाढवल्या. कंपन्यांनी पाठवलेल्या मेलवरून वितरकांनी घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. पूर्वी 1070 रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर आता 1334 रुपयांना मिळत आहे. वाढीव किमतीसोबत महापालिकेच्या एलबीटीमुळे जळगावात गॅस सिलिंडर पुणे आणि मुंबईपेक्षाही महागडे झाले आहे.
देशभरात कमी-जास्त होणार्‍या पेट्रोलच्या किमतीपाठोपाठ पेट्रोलियम कंपन्यांकडून आता गॅसच्याही किमती वाढवण्यात येत आहेत. किती गॅस सिलिंडरवर अनुदान द्यायचे याचा आकडा निश्चित करण्याचा शासन विचार करीत असताना कंपन्यांनी मात्र 1 जानेवारीला सर्व गॅस वितरकांना ई-मेलद्वारे गॅसचे दर वाढवण्याच्या सूचना केल्या. यात जळगावच्या वितरकांना गॅस सिलिंडरचे दर 1070 वरून 1334 रुपये करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरात 40 रुपयांचा फरक
जिल्ह्यात ग्रामीण भागात गॅस सिलिंडरची किंमत 1294 रुपये आहे. तर शहरात 1334 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. गॅस वितरकांच्या मते 12.53 रुपये एलबीटी आकारली जात आहे. मात्र, महापालिकेचे एलबीटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त उदय पाटील यांना किती एलबीटी आकारली जाणार? याबाबत माहिती नाही.
हा तर कंपन्यांचा निर्णय
सिलिंडरच्या किमती वाढवण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. मार्केट दर वाढल्याने ही वाढ झाली आहे. जळगाव शहरात एलबीटीमुळे ग्राहकांना 12.53 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. मुकुंद तांदळे, सेल्स ऑफिसर, बीपीसीएल
शहरात 40 रुपयांचा फर
जिल्ह्यात ग्रामीण भागात गॅस सिलिंडरची किंमत 1294 रुपये आहे. तर शहरात 1334 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. गॅस वितरकांच्या मते 12.53 रुपये एलबीटी आकारली जात आहे. मात्र, महापालिकेचे एलबीटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त उदय पाटील यांना किती एलबीटी आकारली जाणार? याबाबत माहिती नाही.
एलबीटीचा अतिरिक्त भार
1025 रुपयांना असलेल्या सिलिंडरवर 45 रुपये व्हॅट आकारल्याने ते 1070 रुपयांना घ्यावे लागत होते. गॅस वितरकांच्या मते गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये 12.53 रुपये एलबीटी लावण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात ग्रामीण आणि शहरी सिलिंडरमागे 40 रुपयांचा फरक आहे. यातच कंपन्यांनी गॅसच्या किमतीही वाढवल्या आहेत. याचा एकत्रित फटका ग्राहकांना बसला असून यापुढे 1334 रुपयांना गॅस सिलिंडर घ्यावे लागणार आहे. गॅसचे अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने ग्राहकांना पूर्ण रक्कमदेऊन सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे. जळगाव शहरात मुंबईपेक्षा तब्बल 70 रुपयांनी सिलिंडर महाग आहे.