आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात गॅस सिलिंडरचा तुटवडा; पाच हजार ग्राहक वेटिंगवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. बुकिंगनंतर आठ ते दहा दिवसांनी डिलिव्हरी होत असल्याने गॅसग्राहक कमालीचे वैतागले आहेत. भारत, एचपी व इंडेन गॅस कंपन्यांकडे सुमारे पाच हजारांवर सिलिंडरची बुकिंग पेंडिंग आहे. यातील दररोज प्रती एजन्सीधारकाकडून 300पर्यंत डिलेव्हरी होत आहे. औरंगाबादसह मनमाडहून येणारा पुरवठा कमी होत असल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याचे एजन्सी चालकांनी सांगितले.

ऑगस्टच्या प्रारंभी रमजान ईद आणि र्शावण महिना सुरू झाल्यामुळे सिलिंडरची मागणी अचानक वाढली होती. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने वेटिंग वाढत गेली. विविध गॅस कंपन्यांकडून दर शनिवार व रविवार जास्तीचे सिलिंडर देण्यात आले. मात्र, पुरवठय़ापेक्षा मागणी जास्त असल्याने सिलिंडर कमी पडत गेले. त्यामुळे गेल्या महिन्यातील दोन हजार वेटिंगची संख्या आता पाच हजारावर गेली आहे. ती कमी करण्यासाठी तीनही कंपन्यांकडून जास्तीचे सिलिंडर देण्यात येत आहेत. यापूर्वी एजन्सीला दररोज इंडेनच 200 सिलिंडर मिळत होते, ते वाढवून 300 करण्यात आले आहेत. ऑनलाइन बुकिंग करूनही सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने ग्राहकांची भटकंती सुरू आहे. परिणामी सणासुदीत ग्राहकांना पर्यायी इंधनाचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे.