आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन सणासुदीत ग्राहक ‘गॅस’वर, घरगुती गॅस सिलिंडरची वेटिंग लिस्ट वाढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दिवाळीमुळे सध्या घरगुती गॅस सिलिंडरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वेटिंग लिस्टचा आकडा दिवसेदिवस वाढतच चालला आहे. ग्राहकांनी गॅसची ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर त्यांना तिसऱ्या दिवशी सिलिंडरची डिलिव्हरी मिळत आहे. आठवड्याभरात सिलिंडरची ही मागणी अधिकच वाढण्याची शक्यता असल्याने ग्राहकांची आतापासून सिलिंडरची मागणी नाेंदवून ठेवण्यात धडपड सुरू झाली आहे.
दिवाळीच्या सणामुळे विविध खाद्यपदार्थ बनवण्याची रेलचेल जोरात सुरू झाली आहे. हॉटेल व्यावसायिकांसह कारागिरांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा वापर नेहमीपेक्षा दुपटीने वाढला आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर वितरकांकडे नोंदणीची संख्या वाढली आहे. ऐन सणासुदीत सिलिंडरची समस्या उद्भवू नये, यासाठी ग्राहकांकडूनही नोंदणीचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. शहरातील ग्राहकांना दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी सिलिंडर मिळत असले तरी, ग्रामीण भागातील ग्राहकांना सततच्या पाठपुराव्यानंतर पाचव्या दिवशी सिलिंडर मिळत असल्याची स्थिती आहे. भारत, एचपी इंडेन अशा तीन गॅस कंपन्यांचे शहरात १० गॅस एजन्सी चालक आहेत. या वितरकांकडून गॅस सिलिंडरचा सद्य:स्थितीतील पुरवठा वितरण या विषयी माहिती घेतली असता, दोन दिवसांपासून ग्राहकांची मागणी वाढल्याचे चित्र समोर आले आहे.